राजेंद्र चाटे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी

13

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) ; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि उत्कृष्ट कामकाजामुळे ओळख निर्माण करणारे व सध्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई शाखेत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र चाटे हे बँकेतील एक विश्वासार्ह व जबाबदार अधिकारी म्हणून त्यांच्या कर्तव्यदक्ष कामांतून सर्वपरिचित व प्रसिद्ध आहेत. शेतकरी, ग्राहक आणि सहकारी संस्थांच्या हितासाठी ते नेहमी तत्पर राहून काम करतात. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, पारदर्शकता आणि लोकाभिमुख दृष्टीकोन स्पष्टपणे पाहावयास मिळतो.
पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात बँकेची सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आजपर्यंत राजेंद्र चाटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करणे तसेच बँकेच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रामाणिक आणि उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक स्तरांवरून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे, राष्ट्रीय मिडिया प्रमुख मार्गदर्शक तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान विकास मंच आणि युवा क्रांती पोलीस मित्र संघटना यांनी राजेंद्र चाटे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच सहकारी संस्थांवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. राजेंद्र चाटे यांनी यापुढेही अशीच कार्यतत्पर सेवा देत सहकार चळवळीला अधिक बळकटी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *