श्रीरामनवमी व महिला दिनानिमित्त कात्रज येथे सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

90

समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे – (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) : रामनवमी व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक २६ मार्च २०२६ रोजी कात्रज येथे सायंकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात समाजातील उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा तसेच समाजसेवकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलराव माने यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
महा.एनजीओ क्राइम तपास पोलिस बॉईज संघटनेच्या वतीने आयोजित या उपक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून श्री.चेतन शर्मा सर तसेच अक्षर स्कूलचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली सूर्यवंशी मॅडम उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते सन्मानार्थींना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजकार्यातील योगदानाबद्दल सन्मानित व्यक्तींना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. समाजातील महिलांनी विविध अडचणींवर मात करून केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत पुढील काळातही असेच कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *