समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – ग्रामपंचायत फाकटे येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२२-२३ मधील कामांच्या अंमलबजावणीबाबत तपासणीदरम्यान अनियमितता आढळल्याचे निरीक्षण शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी आर गावडे यांचेकडून नोंदविण्यात आले आहे.तालुकास्तरीय तांत्रिक छाननी समितीने मंजूर केलेल्या कामांच्या ऑनलाइन नोंदी व ग्रामस्वराज प्रणालीवरील कामांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. संबंधित कामांसाठी PFMS प्रणालीद्वारे देयके अदा करण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक मंजुरी घेणे अपेक्षित असताना ग्रामपंचायतीने ती मंजुरी घेतली नसल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी जबाबदार असल्याचे नमूद करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यास पात्र असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.हा निरीक्षण अहवाल विस्तार अधिकारी पंचायत,पंचायत समिती शिरूर यांच्याकडून सादर करण्यात आला असून, संबंधित बाबींच्या चौकशी अहवालासोबत पुराव्यांची कागदपत्रे जोडण्यात आली आहेत.