समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – दरवर्षी प्रमाणे यंदाच्या २०२५ या वर्षीही सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री शंकर महाराज पालखी सोहळा सोमवार दि. ०५ रोजी सकाळी सात वाजता अतिशय भक्ती भावाने व सर्वांच्या सहभागाने, सहकार्याने व आशीर्वादाने साजरा करण्यात येत असल्याची माहिती,महाराजांचे निस्सीम भक्त व सोहळ्याचे आयोजक,नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर डॉ.दिनेश रंगरेज,सतीश तावरे,सामाजिक कार्यकर्ते अनिल रेळेकर यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
सद्गुरू श्री शंकर महाराज समाधी पालखी सोहळ्यास सोमवार, दि. ०५ मे २०२५ रोजी उपस्थित राहून दर्शनाचा, प्रसाद व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरु शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले असून हा भव्य पालखी सोहळा दगडूशेठ दत्त मंदिर, ढेकणे मामांचा वाडा येथून सुरु होणार असून या भव्य दिव्य पालखी सोहळ्यात अधिकाधिक भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन गुरुवर्य माऊली जंगले,हभप गणेश महाराज भगत ह.भ.प. पंढरीनाथ कोडे,ऍड.माधवी निगडे व श्री सदगुरु शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.