समाजशील न्यूज नेटवर्क,मुरबाड,ठाणे – (प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे येथे एका ५२ वर्षीय इसमाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केल्याचा थरारक प्रकार घडला असून या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी गणेश तुकाराम भोपी या तरुणाला तात्काळ अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
या घटने बाबत मुरबाड पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार हत्या झालेल्या इसमाचे नाव भालचंद्र नानू बिऱ्हाडे वय ५२असे असून तो जांभुर्डे गावातीलच आहे.आज सकाळी (दि. ३) साडे दहा वाजता च्या सुमारास सदर इसम जांभुर्डे गावाच्या नाक्यावर मोटर सायकलने जात असताना त्याच्या मोटर सायकल ला मारेकऱ्यांच्या रिक्षाने अडवून रिक्षातील गणेश तुकाराम भोपी याने बिऱ्हाडे याच्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले.यात बिऱ्हाडे यास डोक्यावर व मानेवर गंभीर वार झाल्याने व कुऱ्हाडी चे घाव अत्यंत खोलवर गेल्या ने यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे मुरबाड ग्रामीण रुग्णालयात घोषित करण्यात आले.
याप्रकरणी गणेश तुकाराम भोपी यास पोलिसांनी अटक केली असून प्रकाश बंधू भोपी,हरिश्चंद्र तुकाराम भोपी,आदर्श बंधू भोपी व वैशाली प्रकाश भोपी सर्व रा.जाभुर्डे हे फरार झाले आहेत. या सर्वांना तात्काळ अटक व्हावी या मागणी साठी मुरबाड पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
ही निर्घृण हत्या ग्रामपंचायत मधील विकास कामा तील गैरप्रकाराबाबत वारंवार विचारणा करण्याच्या वादातून झाल्याचे बोलले जात असून मयत भालचंद्र बोऱ्हाडे यांचा मुलगा सचिन हा उपसरपंच आहे तर आरोपी प्रकाश भोपी हा माजी सरपंच तर वैशाली भोपी ही विद्यमान सरपंच आहे. त्यामुळे गावातील विकास कामातील सावळा गोंधळ व गैर व्यवहार याचा जाब विचारल्या च्या वादातून ही हत्या घडल्याचं समोर येत आहे. याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 नुसार 103 ,3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भारत तांगडे अप्पर पोलिस अधिक्षक ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते पुढील तपास करत आहेत.