समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडॆ जिल्हा परिषदेची एक नामांकित प्राथमिक शाळा असलेल्या कवठे येमाई प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी शैक्षणिक गुणवत्ता दाखवत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादित केले असून याच शाळेची हुशार विद्यार्थिनी अंशिका अशोक फसले हिने नेत्रदीपक यश संपादित करीत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असल्याचे शाळेचे केंद्रप्रमुख सखाराम फंड यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
कु.अंशिका अशोक फसले हिने 286/300 राज्य गुणवत्ता यादी स्थान मिळवताना ३०० पैकी २८६ गुण मिळवत आपल्या शाळेच्या व कवठे येमाई गावच्या वैभवात भर घातली आहे.तर तेजश्री सुरेश गायकवाड २६८,प्रगती दीपक पडवळ २५२,हर्षदा राजेंद्र शिंदे २४०,श्रीअंश निलेश राजगुरू २४०,समीक्षा संतोष घोडे २२६,वैष्णव शरद साळवे २१८,ईश्वरी विजय बगाटे २१६,समीक्षा प्रकाश वागदरे २०६,श्रावणी विजय इचके २०२,राकेशकुमार हजारीमल पुरोहित १९८ गुण मिळवत उत्तुंग यश संपादित केले आहे. या सर्व विद्यार्थ्याना शाळेच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका शिल्पा बाजीराव गावडे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.तर शाळेचे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक सखाराम फंड,शांताराम पोकळे,सर्व शिक्षक वृंद यांचे ही मोठे योगदान लाभले.
तर पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे,शिरूर तालुका गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांचे ही मार्गदर्शन ही मिळाल्याने हे यश संपादित करण्यात शाळेला यश आल्याचे फंड यांनी सांगितले.मार्गदर्शक शिक्षिका शिल्पा गावडे यांचा त्यांनी शाळेचा नावलौकिक वाढविण्यात केलेल्या प्रामाणिक प्रयत्ना बद्दल गट शिक्षण अधिकारी कळमकर यांनी त्यांचे अभिनंदन करीत सत्कार केला. तर सर्व यशस्वी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका यांचे अध्यक्ष दिनेश पोळ,उपाध्यक्ष,सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कवठे येमाई व समस्त ग्रामस्थ कवठे येमाई यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.