समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचा दि. २१ मे रोजी शिर्डी येथे होणाऱ्या वर्धापन दिनाच्या तयारी च्या पार्श्वभूमीवर आज रविवार दि. ०४ रोजी संघटनेचे राष्ट्रीय संघटक डॉ. राजेश्वर हेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरच्या शेवाळवाडी येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.यात वर्षाताई नाईक,अमृत ताई पठारे,वैशालीताई बांगर या महिला पदाधिकाऱ्यांसह सुमारे २० पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

यावेळी संघटनेत नव्याने सहभागी झालेल्या विविध पदाधिकारी,सदस्य यांची ओळखपत्रे सन्मानपूर्वक देण्यात आली. या बैठकीस उपस्थित नवीन पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्यात व देण्यात आली.संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या बैठकीत आगामी वर्धापन दिन सोहळा,संघटनेचे कार्य,व संघटन वाढ कशी करावी याबाबत डॉ.हेंद्रे व शेलार सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.