समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : १ मे विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर येथे MPSC परीक्षेत विविध पदांवर नियुक्त झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत न्यायाधीश पदावर नियुक्त शुभम विकास कराळे प्रशालेचा २०१४ विज्ञान शाखेचा विद्यार्थी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदावर नियुक्त सागर सुखदेव नळकांडे एस.एस.सी बॅच २०१२ चा विद्यार्थी व सहाय्यक उपनिरीक्षक पदावर नियुक्त मंदार रमेश कळमकर यांचा भव्य सन्मान प्राचार्य श्री सोनबापू गद्रे , शिक्रापूर चे सरपंच रमेशराव गडदे माजी उप. सरपंच सुभाष खैरे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मंगेश शेंडे, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशालेचा वार्षिक निकाल ही जाहीर करण्यात आला, प्रशालेचे प्राचार्य गद्रे सर यांनी वार्षिक निकाल सादर केला. या कार्यक्रमाला उपप्राचार्य सुरेश गंगावणे, पर्यवेक्षक पी जे मेरगळ सर , सुनिल मांढरे, सूरेश खुरपे चंद्रकला मांढरे, तसेच ग्रामस्थ,पालक,शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मांढरे सर यांनी केले. सुत्रसंचालन माऊली कुंभार सर यांनी केले. तर प्रा.नानासाहेब गावडे सर यांनी आभार मानले.
Home शिक्रापूर विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी परंपरा

विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी परंपरा
BySamajsheelMay 4, 20250
Previous Postखरीप हंगाम पूर्व कार्यशाळा शिरूरला संपन्न : कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
Next Post२१ तारखेला होणाऱ्या वर्धापन दिनाची तयारी बैठक पुण्यात संपन्न,पुणे जिल्ह्यातील युवा क्रांतीचे विविध पदाधिकारी उपस्थित,हडपसरच्या शेवाळवाडीत बैठकीचे यशस्वी आयोजन