समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर (पुणे) – (प्रा. सुभाष शेटे, कार्यकारी संपादक) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व ग्रामस्थांच्या सहभागातून अत्यंत उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. शिरूर ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या शिवजयंती उत्सवांपैकी एक म्हणून या कार्यक्रमाने विशेष आकर्षण मिळवले. या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर, शिवतांडव शो, बाहुबली हनुमान देखावा, छावा जिवंत देखावा, प्रभू श्रीराम मूर्ती देखावा, नवज्योत ढोल पथकाचे वादन, सह्याद्री मर्दानी आखाड्याचे खेळ, पालखी सोहळा, नवखंड लाईट शो, पेपर ब्लास्टर, “कवठ्याचा टेडी” तसेच अघोरी साधूंच्या शिवभक्तीचा देखावा अशा कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा आरतीने,महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “वीर छावा” नाट्यप्रयोग आणि अघोरी शैलीतील शिवतांडव हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा आरतीने,महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “वीर छावा” नाट्यप्रयोग आणि अघोरी शैलीतील शिवतांडव हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

या कार्यक्रमाला जि.प. सदस्य राजेंद्र दादा गावडे, पंचायत समिती सदस्या सौ. कांचनताई सांडभोर, राजेशभैय्या सांडभोर, सुनीलभैय्या वागदरे, निखिल गोसावी (महाराष्ट्र पोलीस), अभिजीत सांडभोर, नवा वागदरे, पवनराजे जाधव, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारू आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान जि.प. सदस्य राजेंद्र गावडे यांनी कवठे येमाई येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे संघटन व नियोजन कौतुकास्पद असल्याचे सांगितले. बेट भागातील नागरिकांनीही या भव्य शोभायात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत व कौतुक केले.
कार्यक्रमासाठी टाकळी हाजी पोलीस स्टेशन औट पोस्टचे सहायक पोलीस निरीक्षक कारंडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच मर्दानी खेळांचे सादरीकरण अक्षय पवार, विक्रांत रणसिंग व राष्ट्रीय पंच शौकत मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली बेटभागातील विद्यार्थिनींनी केले.या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बजरंग दलाचे संदीप भोर, श्रेयस गायखे, रितेश भोर, सचिन माकर, सचिन गोसावी, सागर सांडभोर, साहिल सांडभोर, किरण पडवळ, कालिदास शेटे, संतोष गोसावी, निखिल लांघे यांसह गावातील सर्व कार्यकर्त्यांनी महिनाभर परिश्रम घेतले. कार्यक्रमास विशेष सहकार्य पंचायत समिती सदस्य राजेशभैय्या सांडभोर यांचे लाभले. पारंपारिक रूढी-परंपरेनुसार आणि उत्साहात हा भव्य शिवजयंती उत्सव यशस्वीपणे पार पडल्याची माहिती बजरंग दल ग्रामीण सहसंयोजक सुरेश साबळे यांनी दिली.

