समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई गावठाण परिसरात आज गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला अचानक फुल रेस झाल्याने झालेल्या अपघातात कविता खाडे या महिला दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्या. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट गावठाणातील वीर हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या फरशीवर जोरात जाऊन धडकली. या अपघातात कविता खाडे यांच्या एका पायाला जोरदार मार बसला. सुदैवाने रस्त्यावर अन्य कोणी आडवे न आल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी कवठे येमाई गावचा बाजार आटोपल्यानंतर कविता खाडे यांनी काळे आळी परिसरात उभी केलेली आपली डुएट दुचाकी सुरू केली. मात्र, गाडी सुरू करताच तिने अचानक वेग घेतला. दुचाकीला फुल रेस झाल्याने आणि ब्रेक लावूनही गाडीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने त्या काही करू शकल्या नाहीत. भरधाव झालेली दुचाकी थेट वीर हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या भिंती नजीकच्या फरशीवर जाऊन आदळली. धडकेनंतर दुचाकी कविता खाडे यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या एका पायाला दुखापत झाली.
पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पत्रकार सुभाष शेटे यांच्यासह ग्रामस्थांची तत्पर मदत
अपघात घडताच जवळच बसलेले ज्येष्ठ पत्रकार तथा पोलीस मित्र संघ महाराष्ट्राचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बाळू गोसावी यांच्यासह इतर ग्रामस्थांनीही तत्परतेने मदत केली. सर्वप्रथम दुचाकी बंद करून ती बाजूला घेण्यात आली. त्यानंतर कविता खाडे यांना दुखापत झाली आहे का, याची विचारपूस करण्यात आली.त्यांना उभे करण्याचा प्रयत्न केला असता एका पायाला अधिक मार लागल्याचे जाणवल्याने आधार देऊन खुर्चीवर बसविण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती.
दुचाकीतील तांत्रिक दोष काही मिनिटांत दूर
सायंकाळ होत असल्याने प्रा. सुभाष शेटे यांनी गावातील अनुभवी दुचाकी मेकॅनिक संजय कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. दुचाकीला अचानक फुल रेस होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर संजय कदम हे आपल्या सहकाऱ्यासह तातडीने वीर हनुमान मंदिराजवळ पोहोचले. त्यांनी दुचाकीची तपासणी करून काही मिनिटांत तिच्यातील दोष दूर केला.दरम्यान, कविता खाडे यांची प्रकृती काहीशी सुधारल्यानंतर त्या खुर्चीतून उठून आधाराने चालू लागल्या. त्यानंतर त्यांनी दुचाकीवर आपले बाजार साहित्य ठेवले आणि मुंजाळवाडी येथील घराकडे प्रस्थान केले.
दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला!
दुचाकी अचानक वेगात गेल्यानंतर चालक महिलेचे नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. अशा परिस्थितीत दुचाकी रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला धडकली असती, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, दुचाकी थेट मंदिराच्या बाजूला असलेल्या फरशीवर धडकल्याने अन्य कोणालाही इजा झाली नाही. त्यामुळे कविता खाडे यांच्यासह ग्रामस्थांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.या घटनेमुळे दुचाकी सुरू करताना अचानक वेग वाढणे, ब्रेक निष्क्रिय होणे किंवा वाहनावरील नियंत्रण सुटणे यांसारख्या तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष न करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दुचाकी मध्ये असा दोष जाणवल्यास वाहन तातडीने बंद करून तज्ज्ञ मेकॅनिककडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
सुदैव, ग्रामस्थांची तत्परता आणि मेकॅनिकची मदत यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.