शरद पवारांनी जाच्यावर विश्र्वास टाकला तो उमेदवार विजयी झाला – खासदार सुरेश म्हात्रे यांचा विश्वास

505
समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे सरळगावं येथे आज खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शरद पवार ज्यांच्यावर विश्र्वास टाकतात तो उमेदवार विजयी होतों. लोकसभेला माझ्यावर विश्वास टाकला आणि आपल्या सहकार्याने मी विजयी झालो आता तुम्हाला शरद पवार यांचा विश्र्वास सार्थकी लावण्याचे काम करावे लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, येणारे सरकार पंच सूत्री कार्यक्रमावर काम करणार आहे. राज्यांत महालक्ष्मी योजना राबवत महिलांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील , महिलांना मोफत बस प्रवास, बेरोजगारांना चार हजार रुपये बेरोजगार भत्ता, शेतकऱ्यांना दीड लाखा पर्यंत कर्ज माफी व नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जाईल, 5 लाखा ऐवजीं 25 लाखांचा आरोग्य विमा दिला जाईल तर जात निहाय जनगणना करून आरक्षण मुद्दा मार्गी लावू असा अजेंडा असल्याचे जाहीर केले.यावेळी त्यांनी मी पुढें राहिलं ना राहील पण तुम्ही पवार साहेबांची साथ सोडू नका असा सल्ला सुभाष पवार यांना देत समोरचा उमेदवार ही मातब्बर असला तरी शरद पवार यांचा विश्र्वास आपल्याला खरा करून लोकसभे प्रमाणे विधानसभेत हि तुतारी वाजवू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी परिवर्तनाचे भागीदार व्हा, मतदार संघात फिरताना सर्वांची इच्छा जरी परिवर्तनाची असली तरी आपल्या माध्यमातुन हे परिवर्तन घडविण्यासाठी एकत्र या असे आवाहन केले. मागील वेळी मुरबाड मतदार संघात 1 लाख 10 हजार मतदार होते. आता ते सव्वा लाख आहे. सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या शिफारशी मुळे शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकला. ग्रामीण आदिवासी भागांत मी 2021 पर्यंत रिक्त शिक्षक संख्या भरून काढल्या होत्या. मात्र आता अनेक शाळा रिक्त आहेत त्यामुळे आगामी काळात ती चूक सुधारली पाहिजे. असा विश्वास व्यक्त केला. तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी महायुती सरकार वर घणाघाती टिका करताना हे सरकार बनवटांचे सरकार असल्याचे म्हटले. तर आर पी आय  (सेक्यू) जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर मतदार संघातील दलीत वस्ती अजूनही सुधारणा न झाल्याचे सांगत कल्याण तालुक्यातील रायते गाव आमदारांनी दत्तक घेतले असताना या गावांतील दलीत वस्ती गावात येतं नाहीं का असा सवाल उपस्थित केला.  यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दीपक वाघचौरे, मधूकर आप्पा घुडे, संतोष विशे, रुपाली कराळे, उर्मिला लाटे, कविता वरें उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. एक प्रकारे सरळगाव जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीने शक्ति प्रदर्शन करत महायुतीला आव्हान दिले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds