समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील ऐतिहासिक जागृत देवस्थान असलेल्या श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रि उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळाली. दरम्यान काही वर्ष या गावात राहून व्यवसाय करणारे व सध्या शिरूर येथे वास्तव्यास असणारे संदीप,दिपक रुणवाल व कुटुंबीयांनी मागील १४ वर्षांपासून त्यांनी गावठाणातील महादेव दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना सुरु केलेली खिचडी प्रसाद वाटप परंपरा आज १४ व्या वर्षी ही जपली आहे. याच बरोबर भाविक भक्तांना भक्तांना त्यांच्याकडून केळी वाटप ही करण्यात येत असून त्यांनी सुरु ठेवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिठूलाल बाफणा,नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या कांचनताई राजेश सांडभोर,लक्ष्मणनाना मुखेकर,रामदास माळवदे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर,ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार बाफणा व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. तर जोपर्यंत प्रभू महादेव यांच्या कृपा आशीर्वादाने खिचडी वाटप उपक्रमक सुरु ठेवता येईल तो पर्यंत विनाखंड हा सेवाभावी उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचे दिपक रुणवाल यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले.
श्रावणातील सोमवारी व नित्य ही भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येत या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येथे असतात. महाशिवरात्र उत्सवानिमित्ताने ग्रामस्थांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून सकाळी पूजा पाठ, अभिषेक, दिवसभर खिचडी वाटपाचा कार्यक्रम, संध्याकाळी दीपमाळ प्रज्वलन,भजन आयोजित करण्यात आल्याची माहिती पुजारी सुरेश शिंदे (गुरव) यांनी दिली.भाविकांनी महादेवाच्या दर्शनाचा,खिचडीचा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.



