समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : गावाच्या विकासासाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या विनियोगाचा हिशेब मिळत नसल्याने फाकटे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विकासकामांसाठी लाखो रुपयांचा खर्च नोंदवला जात असताना प्रत्यक्ष कामांची स्थिती समाधानकारक नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश शितोळे व ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.या बाबतचा पत्रव्यवहार पंचायत समिती शिरूरकडे करण्यात आला असून आज सकाळी शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपोषणस्थळी भेट देत तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली असून संबंधितांना तशा खुलासा करण्याच्या नोटीस ही देण्यात आल्याचे डोके यांनी सांगितले. तर येत्या दोन – तीन दिवसांत खुलासा प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा बी डी ओ महेश डोके यांनी दिला आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते योगेश सावकार शितोळे, रेखाताई दरेंकर (माजी सरपंच), सीमा केदारी (ग्रा.पं. सदस्य), भारत वाळुंज (माजी ग्रा.पं. सदस्य) आणि शिवाजी गावडे (संचालक, श्रीराम सोसायटी) यांनी विकासनिधीचा हिशेब जनतेसमोर सादर करावा व कामांची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
सार्वजनिक मुतारी, कचरा व्यवस्थापन, नाना-नानी पार्क, आरओ प्लांट आदी कामांच्या खर्चाबाबत तसेच देखभाल-दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि आरोग्य केंद्रातील साहित्य व सुविधांवरील खर्चाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कागदोपत्री खर्च दाखविलेली कामे प्रत्यक्षात कुठे आहेत आणि पूर्ण झाली असल्यास त्यांचे पुरावे उपलब्ध आहेत का, असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे व त्यांच्या वैद्यकीय टीमने शितोळे यांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे.
Home पुणे फाकटे ग्रामपंचायतीच्य विकासनिधीच्या गैरवापराची चौकशी करा ; हिशेबासाठी योगेश शितोळे यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरूच; ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही शितोळे यांचा इशारा

फाकटे ग्रामपंचायतीच्य विकासनिधीच्या गैरवापराची चौकशी करा ; हिशेबासाठी योगेश शितोळे यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरूच; ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही शितोळे यांचा इशारा
BySamajsheel NewsNovember 27, 20260
Previous Postसंघर्ष कितीही असला तरी सामाजिक हितासाठी लढा थांबणार नाही!”शिरूरमध्ये सामाजिक कार्य करणे दिवसेंदिवस कठीण; मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करूनही निलेश वाळुंज यांची समाजहिताची भूमिका कायम
Next Post१५ व्या वित्त आयोगाच्या कामांसाठी वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी न घेतल्याने ग्रामपंचायत फाकटे प्रशासनावर ठपका : तपासणीदरम्यान अनियमितता आढळल्याचे विस्तार अधिकारी बी आर गावडे यांचे निरीक्षण
