NEWS
Search

मुरबाड मतदार संघात महाविकास आघाडीला आदिवासी क्रांती सेनेचा जाहीर पाठिंबा

196
समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) :  मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांना आदिवासीं क्रांती सेनेने जाहीर पाठिंबा दिल्याने. आदिवासी जनता सतत संघर्ष करीत आहे ,मोठ्या प्रमाणात आदिवासीं समाजाला समस्यांना सामोरे जावे लागत आहे .आजही ग्रामीण भागात रस्ते,पाणी,वीज अशा समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील जनतेला संघर्ष करावे लागत आहे.हा संघर्ष कोणीतरी थांबवला पाहिजे ही भूमिका आदिवासीं  संघर्ष समितीने मांडली त्यामूळे बदल होणे गरजेचे असल्याने आदिवासी क्रांती सेना कटिबद्ध असून यासाठी सुभाष पवार यांना पाठिंबा देत असल्याचे संस्थापक अध्यक्ष दिनेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *