समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर, पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथील जुन्या पिढीतील आजी श्रीमती सावित्रीबाई रघुनाथ शिंदे (गुरव) यांचे आज गुरुवार दि. १८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्ष वयाच्या होत्या.अत्यंत संयमी,शांत व प्रेमळ स्वभावाच्या असलेल्या श्रीमती सावित्रीबाई आजींच्या जाण्यामुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात रोहिदास,सुरेश,संजय ही तीन मुले व मंदा हि मुलगी,जावई,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

Previous Postश्री येमाई देवीच्या कृपा आशीर्वादाने जीवनात नवचैत्यन्य : श्री रामदास बाबुराव रोहिले व पुत्र सुरज रोहिले यांच्याकडून देवीच्या प्रती कृतज्ञता ; रविवारी होणार भव्य शेरणी,नवस पूर्ती कार्यक्रम
Next Postशिरूरला सरसेनापती हंबीरराव मोहिते,स्वराज्य सौदामिनी छत्रपती महाराणी ताराबाई पुण्यतिथी संपन्न : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ऐतिहासिक राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार देऊन गौरव


