समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असताना व सेवा निवृत्ती जवळ आली असतानाच दोन वर्षांपूर्वी भल्या सकाळीच दुचाकीवरून आपल्या रोहिलवाडी येथील शेताकडे निघालेले माजी ग्रामपंचायत सदस्य श्री रामदास बाबुराव रोहिले यांच्या दुचाकीस भीषण अपघात झाला होता. कवठे येमाई गावच्या माजी सरपंच पत्नी संगीता रोहिले, मुलगा सुरज, मुलगी काजल,सुवर्णा, नातलग व मित्र परिवाराने तात्काळ पुणे येथील रुग्णालयात दाखल केले. सुमारे दीड महिना कोमात गेलेले व मृत्यूशी झुंज देत उपचारांना प्रतिसाद दिल्याने रामदास रोहिले यांना नवचैतन्य प्राप्त झाले. सर्वांनी अथक परिश्रम घेतले,व सुमारे दीड वर्षांनी रोहिले सर माणसे ओळखू लागल्याने रुग्नालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला व ते पुन्हा आपल्या गावीघरी,मुलाबाळांच्या,नातलगांच्या, मित्र परिवार व सहकाऱ्यांच्या सानिध्यात दाखल झाले. शरीरास अनेक ठिकाणी इजा होऊन ही लाखो रुपये खर्च केल्याने व सरांनी उपचारास योग्य प्रतिसाद दिल्याने आज घरच्या,पूर्ण गावाच्या,मित्रपरिवाराच्या सहवासात आनंदी जीवन जगत आहेत.

एवढ्या मोठ्या भीषण अपघातातून सहीसलामत वाचल्याने गावचे ऐतिहासिक ग्रामदैवत व एक जागृत देवस्थान असलेल्या श्री येमाई देवीच्या कृपेनेच पुनर्जन्म झाल्याची मनोमन पूर्ण भावना असल्यानेच रोहिले सरांनी देवीचा नवस फेडण्याचा संकल्प केला. मुलगा सुरज ने हि वडिलांच्या अपघाताच्या ह्या भयंकर आघातातून सावरत गगन भरारी घेतली आहे. संकल्प पूर्ती झाल्याने रोहिले कुटुंबाला पुन्हा नवचैतन्य प्राप्त झाले.आता रविवार दि. २१ डिसेंबर रोजी श्री येमाई देवीच्या प्रति कृतज्ञता म्हणून शेरणी वाटप, श्री येमाई देवी चौक ते श्री येमाई देवी मंदिर पर्यंत भव्य शेरणी मिरवणूक, देवीला साडी चोळी, आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी महाप्रसाद हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्वतः श्री रामदास बाबुराव रोहिले सर यांनी सा. समाजशील शी बोलताना दिली.कार्यक्रम वेळेत संपन्न होणार असून सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व आप्तेष्ट,नातेवाईक,मित्रपरिवार यांनी या शेरणी व महाप्रसाद कार्यक्रमासाठी वेळेत व आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री सुरज रामदास रोहिले (उद्योगपती) यांनी केले आहे. संपर्कासाठी श्री रामदास रोहिले सर यांचा ९९६०२५५५४७,श्री सुरज रोहिले ७०३०४०३९८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



