समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यात लोकहिताची कामे करतानाच अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार विरुद्ध परखड आवाज उठवत सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून मागील ३ वर्षांपासून कार्यरत असणारी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा बुधवार दि.०४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.तसेच या मेळाव्यात १०० गुणवंत विद्यार्थी व संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ट संघटन व संघटनेचा सामाजिक मदतीतून प्रामाणिकपणे कार्य करीत नावलौकिक उंचावणाऱ्या संघटनेतील पदाधिकारी सदस्य यांचा ही विशेष गौरव करण्यात येणार असल्याचे डॉ. हेंद्रे यांनी सांगितले.

पुणे येथील पद्मावती नगरच्या विणकर सभागृहात दि. ०४ फेब्रुवारी रोजी हा मेळावा सकाळी ११ ते ०४ या वेळात आयोजित करण्यात आला असून संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.तर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांचे माहितीपूर्ण व्याख्यान व त्यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती ही डॉ.हेंद्रे यांनी दिली.या १०० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.डॉ. अशोक नगरकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे समवेत कार्य.रवींद्र सूर्यवंशी,संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, ह भ प नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय उपाध्यक्ष,जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय युवती अध्यक्ष, नानासाहेब बढे पाटील, संचालक तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष, ह भ प मधुकर अहिरे तथा अवचित आनंद महाराज – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व इतर मान्यवर सदस्य,पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून संघटनेच्या अधिकाधिक सदस्य,पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन युवा क्रांती संघटनेच्या पुणे टीम च्या वतीने करण्यात आले आहे.



