समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यात लोकहिताची कामे करतानाच अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार विरुद्ध परखड आवाज उठवत सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून मागील ३ वर्षांपासून कार्यरत असणारी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा बुधवार दि.०४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला असून हा मेळावा वेळेतच संपन्न होणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे,युवा अध्यक्ष महाराष्ट्र शिवाजीराव शेलार यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.तसेच या मेळाव्यात १२० गुणवंत विद्यार्थी व संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ट संघटन व संघटनेचा सामाजिक मदतीतून प्रामाणिकपणे कार्य करीत संघटनेचा नावलौकिक उंचावणाऱ्या संघटनेतील पदाधिकारी सदस्य यांचा ही विशेष गौरव करण्यात येणार असल्याचे डॉ. हेंद्रे,शेलार यांनी सांगितले.

समाजात घडणारा अन्याय,अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध संघटनेच्या माध्यमातून मुंबई,पुणे,धुळे,नंदुरबार,अहिल्यानगर जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात उत्तम प्रकारे सदस्य व पदाधिकारी कार्य करीत आहेत. विविध जिल्हा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, संघटक, संपर्क प्रमुख, मार्गदर्शक, सल्लागार, असे विविध पदाधिकारी तालुक्यातुन संघटनेत सहभागी करून घेतली जात आहेत.जेणेकरून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सर्व सामान्य,विविध ठिकाणी अडवणूक होत असलेल्या नागरिकांना त्यांचा हक्क नियमानुसार मिळवून देण्यात मोठी मदत होत आहे. सर्वसमावेशक,समाजातील कुठल्याही घटकाला कुठेही काही अडचण येत असेल त्या ठिकाणी त्या घटकाच्या,समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे मुख्य काम युवा क्रांती पोलीस मित्र संघटने अंतर्गत विनाशर्थ सुरु आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी ज्या त्यागातून ३ वर्षांपूर्वी शिर्डी ता.कोपरगाव येथे लावलेले हे छोटेशे रोपटे त्याचा आज वटवृक्ष झालेला पाहून व संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक होत असल्याने संघटनेतील प्रत्येक सदस्य पदाधिकाऱ्यांचा उर भरून येत असून केवळ सामाजिक कार्यासाठी संघटनेत आलेल्या प्रत्येकास मनस्वी आनंद होताना दिसत आहे.संघटने मार्फत राज्यातील विविध विभागात वर्षभरात मार्गदर्शनपर मेळावे घेण्यात येत असून पुढील महिन्यात पुणे येथील पद्मावती नगरच्या विणकर सभागृहात दि. ०४ फेब्रुवारी रोजी हा मेळावा सकाळी ११ ते ०४ या वेळात आयोजित करण्यात आला असून संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.तर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांचे माहितीपूर्ण व्याख्यान व त्यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती ही डॉ.हेंद्रे यांनी दिली.या १२० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. अशोक नगरकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे समवेत कार्य.रवींद्र सूर्यवंशी,संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, ह भ प नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय उपाध्यक्ष,जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय युवती अध्यक्ष,उपाध्यक्षा वर्षाताई नाईक, नानासाहेब बढे पाटील, संचालक तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष, ह भ प मधुकर अहिरे तथा अवचित आनंद महाराज – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार,युवा क्रांतीची मुलुख मैदानी तोफ व संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या खांद्याला खांदा लावून गोर गरीबांच्या न्याय हक्कांसाठी मागिल २० वर्षांपासून सातत्यपूर्ण लढा देत हजारो जणांना विनाशर्थ न्याय मिळवून देणारे व मिडीयाच्या माध्यमातून युवा क्रांती संघटनेचे नाव व कार्य राज्यभरात पोहचविणारे वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान विकास मंच,राष्ट्रीय मिडीया प्रमुख,मार्गदर्शक व इतर मान्यवर सदस्य,पदाधिकारी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून संघटनेच्या अधिकाधिक सदस्य,पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन युवा क्रांती संघटनेच्या पुणे टीम च्या वतीने करण्यात आले आहे.



