समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र्र प्रदेश महिला संघटक तथा पुणे धनकवडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षा नाईक यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली असून नुकत्याच पुणे येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रम सोहळ्यात नाईक यांना दैनिक संध्या च्या वतीने देण्यात आलेल्या संध्या भुषण पुरस्कार २०२५ भूमाता ब्रिगेड च्या संस्थापिका तृप्तीताई देसाई,दैनिक संध्या चे मुख्य संचालक संजय जगताप,संपादिका ज्योती नाळे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,पदक,प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.



तर नुकतेच श्रीमती वर्षा नाईक यांना त्या सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबाबद्दल दैनिक नवराष्ट्र च्या वतीने ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. दैनिक संध्या यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सामाजिक कार्यकर्ते महिला पुरस्कार 2025 चा सन्मान युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख संघटक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षा नाईक यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,डॉ.राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे,अमृत ताई पठारे,मीना गवारे,हभप नाना महाराज कापडणीस,पत्रकार सुभाष अण्णा शेटे,शिवाजीराव शेलार,समीर नाईक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.