समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक प्रश्नांची सोडवणूक तीही प्रामाणिकपणे व विनाशर्त करण्याचे ध्येय ठेवल्यास तो पत्रकार खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभास अनुसरून कार्य करताना दिसून येतो अशा प्रामाणिक पत्रकारांची नक्कीच दखल घेतली जाते. मागील २० वर्षांपासून पत्रकारितेतून विविध सामाजिक प्रश्न निस्वार्थपणे विविध माध्यमातून मांडून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकामी सतत प्रयत्नशील असणारे तसेच युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेत कार्यरत राहून संघटनात्मक उत्कृष्ट कार्य व वेळो वेळी संघटनेतील सहकार्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणारे संघटनेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख तथा मुख्य मार्गदर्शक, राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांना व इतर ५४ सहकार्यांना युवा क्रांती संघटनेचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण युवा क्रांती संघटनेच्या शिर्डी येथे दि. २१ जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय भव्य दिव्य वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी सा. समाजशील शी बोलताना दिली.







संघटने मध्ये कार्यरत राहून उत्कृष्ट संघटन व प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करून संघटनेचा नावलौकिक वाढविणाऱ्या राज्यातील एकूण ५५ पदाधिकारी,सदस्य यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने भाऊसाहेब शेळके ( संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, किरण वाघमारे (राष्ट्रीय सह कार्याध्यक्ष) जयश्रीताई गावित (महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख), उमेश श्रीवास्तव (राष्ट्रीय संपर्क प्रमुख),ह. भ. प. अवचितानंद महाराज आहिरे ( प्रदेशाध्यक्ष), ह. भ. प. नाना महाराज कापडणीस ( राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा तक्रार समिती अध्यक्ष ),मा. सुभाष आण्णा शेटे (राष्ट्रीय मिडिया प्रमुख तथा मुख्य मार्गदर्शक),श्रीमती वर्षाताई नाईक ( महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक),किरणताई बेंडाळे (उत्तर महाराष्ट्र महिला कार्याध्यक्षा), सुगंधाताई बाळासाहेब भगत (पुणे जिल्हा महिला मार्गदर्शक),वैशालीताई सोनवणे (संगमनेर तालुका कार्याध्यक्षा),संतोष जमधाडे (निफाड तालुका अध्यक्ष),निशाताई हेमंत जोशी ( उत्तर महाराष्ट्र महिला), छायाताई नवले ( पुणे जिल्हा ग्रामीण महिला संपर्क प्रमुख),राधाताई सतीश वाघ (नाशिक शहर महिला संपर्क प्रमुख), संतोष हरावडे ( ठाणे जिल्हा अध्यक्ष ), पारधी मयूर संपत (संगमनेर तालुका सदस्य ),वसुधाताई वैभव नाईक ( महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा ),कल्पना ताई पुंडे ( शिरूर तालुका महिला उपाध्यक्षा),डॉ. राजेश्वर हेंद्रे ( राष्ट्रीय संघटक ), भागवत झाल्टे ( नाशिक जिल्हा अध्यक्ष ), संगीताताई अंबादास जाधव ( निफाड तालुका सदस्या), संगीताताई कापडी ( राष्ट्रीय महिला संघटक ), एकनाथ विठ्ठल राळे ( फाकटे ग्राम प्रमुख),सुरेशराव आप्पा पुनमचंद गायकवाड ( राष्ट्रीय सह संघटक ),स्वातीताई मारुती खैरे (खेड तालुका महिला संपर्क प्रमुख), मनीषाताई नानाजी वनीस (नाशिक शहर सदस्या), विठाबाई पगारे (नाशिक जिल्हा अध्यक्ष),सुदाम रणदिवे (पुणे जिल्हा अध्यक्ष),प्रियांकाताई शेलार (हडपसर,पुणे शहर उपाध्यक्ष ) जयश्रीताई आहिरे (राष्ट्रीय संघटक),राकेश वाघ (महाराष्ट्र प्रदेश सचिव),ह. भ. प. प्रकाश राणे महाराज (महाराष्ट्र प्रदेश सल्लागार),संगीताताई महाले (नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा ),प्रा.दिलीप पाटील (राष्ट्रीय मार्गदर्शक),दिनेश मेहता (राष्ट्रीय मार्गदर्शक),शिवाजी शेलार (महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष),काशिनाथ कोळी (महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष),भालचंद्र चित्ते (महाराष्ट्र प्रदेश महिला मार्गदर्शक), हरीश पाटील (महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष), कुंभार ( महाराष्ट्र प्रदेश युवा सल्लागार), गिरीष मोरे (महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव ) मंगेश परदेशी ( महाराष्ट्र प्रदेश युवा संपर्क प्रमुख), विनोद चौधरी (तळोदा तालुका अध्यक्ष),योगिता सुनिल वाघ (पालघर जिल्हा महिला अध्यक्षा),पोपट जाधव ( निफाड तालुका संपर्क प्रमुख),आश्वीनी ताई धोपावकर (नाशिक जिल्हा सदस्या),अमृत ताई पठारे ( राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा),जयश्री ताई इंगळे (राष्ट्रीय महिला संपर्क प्रमुख),सय्यद शेख ( उत्तर महाराष्ट्र युवा संघटक), नितिन कुंदे (राष्ट्रीय युवा संपर्क प्रमुख),शबनम सय्यद अली शेख (निफाड तालुका सदस्या),शोभा ताई पाटील ( उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा),ह. भ. प. राहुल महाराज कडु (विदर्भ अध्यक्ष),मा. एकनाथ जाधव ( कोपरगाव तालुका युवा अध्यक्ष)या प्रमाणे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाले असून पुरस्कार घेण्यासाठी हा स्वतः पदाधिकारी उपस्थित असेल तरच दिला जाईल, जर कुणी दुसऱ्या पदाधिकारी यांनी पुरस्कार घेण्याचा प्रयत्न केला तर नाकारण्यात येईल. हा पुरस्कार गैरहजर पदाधिकारी /सदस्य यांना दिला जाणार नसल्याचे ही रविंद्र सूर्यवंशी (संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष) संचालक मंडळ, राष्ट्रीय, प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.