समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या २३ राज्य व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची राज्यातील विविध जिल्ह्यासाठी जिल्हा विकसन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २३ जणांना राज्यातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी राज्याच्या जिल्हा,तालुक्यात,गावात संघटन वाढी साठी अथक परीश्रम घेत अधिकाधिक संघटन वाढ करण्याचे आवाहन केले आहे.याकामी जिथे जिथे गरज असेल,योग्य कामी अडचण भासेल तिथे तिथे संघटनेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक तथा राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष शेटे यांच्या ९९७५६७४२८६,९४२३०८३३७६ यांच्या या क्रमांकावर निसंकोच पणे संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
युवा क्रांती संघटनेच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन मीटिंगमध्ये माननीय रविंद्र सुर्यवंशी,संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांना एका जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय संघटक डॉ. राजेश्वर हेंद्रे यांचे मार्फत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार जिल्हा निवडण्यासंबंधी संपर्क करण्यात आला होता. त्याला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यानुसार खालील प्रमाणे २३ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा विकसन अधिकारी (District Development Officer – DDO) म्हणून करण्यात आलेली आहे.


महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रा बाहेरील जिल्ह्यांमध्ये नेमणुका करण्याचे कार्य चालू असून संघटनेतील सर्वांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक “जिल्हा विकसन अधिकाऱ्यांची” खालील प्रमाणे जबाबदारी राहील.जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वातील पदाधिकारी व सदस्य यांच्याशी संपर्क करून कार्यकारणी पूर्ण करणे, सदस्य संख्या वाढविणे या कामात लक्ष घालावे,जिल्ह्यातील अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द करून त्यांची जागी कार्यक्षम जिल्ह्यातील अकार्यक्षम पदाधिकाऱ्याची नियुक्ती रद्द करुन त्यांची जागी कार्यक्षम पदाधिकारी नेमणे,संघटनेचा प्रसार करण्यासाठी योग्य ती माहिती प्रेरणा वैयक्तिकरित्या अथवा ऑनलाईन मीटिंग आयोजित करून देण्यात यावी.संबंधित जिल्हयामध्ये संघटनेमार्फत कार्यक्रमाची रूपरेषा तयार करणे, लोकांना माहिती देणे व संघटनेचा प्रचार कसा होईल यादृष्टीने नियोजन करणे, स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडविणे आणि समाजसेवा करून संघटने विषयी आपुलकी जनमानसात निर्माण करणे गूगल मीटवर ऑनलाईन होणाऱ्या मासिक मीटिंग मधील सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांचा सहभाग वाढविणे याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.