NEWS
Search

कवठे येमाई विद्यालयाचा १० वीचा निकाल ९७.८२ टक्के : पहिल्या तीन क्रमांकात मुलींनीच मारली बाजी 

203
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – रयत शिक्षण संस्थेचे शिरूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स या विद्यालयाचा यावर्षीचा १० वीचा निकाल  ९७.८२ टक्के लागला असून पहिल्या तीन ही क्रमांकात मुलींनीच मारली बाजी मारली आहे. विद्यालयाने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्राचार्य किसनराव रत्नपारखी व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
एस एस सी परीक्षा सन २०२५ फेब्रुवारी,मार्च मध्ये घेण्यात आल्या होत्या. यात न्यू इंग्लिश स्कुल कवठे विद्यालयाने उत्तुंग यश संपादित केले प्रथम तीन विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली.यात अनुक्रमे हिलाळ वेदश्री एकनाथ हिने ८९.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, पुंडे भक्ती मच्छिन्द्र ८८.२० टक्के मिळवत द्वितीय तर शिंदे वैष्णवी पांडुरंग हिने  ८७.६० टक्के गन मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयाचे प्राचार्य, जगदीश टिकले व प्रभारी प्राचार्य अविनाश थोरात,सर्व शिक्षकांनी घेतलेले अथक परिश्रम याच बरोबर शैक्षणिक बाबतीत शालेय स्कूल कमिटी व अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती कवठे येमाई यांची मिळालेली प्रोत्साहन पर मौलिक साथ यामुळे हे यश मिळाल्याने ग्रामस्थ व माजी विद्यार्थांकडून अभिनंदन होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds