NEWS
Search

शिरपूरची खंडेराव बाबा यात्रा उत्साहात : युवाक्रांती च्या धुळे जिल्हा टीम कडून यात्रेत चोख बंदोबस्त : शिरपूरचे पीआय परदेशी यांनी केले पोलीस मित्रांचे अभिनंदन 

68
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – श्री खंडेराव बाबा एका संस्था शिरपूर जिल्हा धुळे येथे सध्या यात्रौत्सोव मोठ्या उत्साहात व धामधुमीत सुरु आहे. अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व विनाशुल्क मदतीचा हात देणाऱ्या युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष गिरीश मोरे,अशोक महाराज व संघटनेतील बहुतांश सदस्य,पदाधिकारी यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला यात्रे दरम्यान बंदोबस्त ठेवण्या कामी,यात्रेकरूंना दर्शन रांगेतून खंडेराव बाबांचे सुलभ दर्शन घेता यावे म्हणून बंदोबस्तास मदत दिली आहे.यात संघटनेचे धुळे जिल्ह्यातील सुमारे ५० सदस्य,पदाधिकारी ओळखपत्रासह सहभागी झाले आहेत.
     
    धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे श्री खंडेराव बाबा एका संस्था एक जागृत व प्रसिद्ध देवस्थान आहे. सध्या यात्रा उत्सव सुरु असल्याने दररोज हजारो भाविक भक्त श्रद्धेने नवस फेडण्यासाठी व देवाचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबांसह येथे येत आहेत. श्री खंडेराव बाबा एका संस्था शिरपूर जिल्हा धुळे येथील यात्रेत युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक, पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष गिरीश दादा मोरे व शिरपूर तालुका युवा क्रांती पोलीस मित्र टीम सहा वाजल्यापासून बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांना मदत करीत आहेत.याच बरोबर दर्शन बारी मधील भाविकांना लाईन मध्ये व लवकरात दर्शन व्हावे म्हणून आपली युवा क्रांती संघटनेची टीम मंदिरात पोलीस प्रशासनास व मंदिराचे  पुजारी यांना योग्य ती मदत करीत आहेत.धुळे,शिरपूरच्या पोलीस मित्र टीम ने केलेल्या कौतुकास्पद मदत व कामगिरी बद्दल शिरपूरचे पोलीस निरीक्षक  किशोर कुमार परदेशी,श्री खंडेराव महाराज चे ट्रस्ट अध्यक्ष कैलास धाकड व उपाध्यक्ष खंडेराव मंदिर इतर सभासद व युवा क्रांतीचे बुलंद कार्यकर्ते पोलीस मित्र शिरपूर टीम मधील अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष गिरीश मोरे व त्यांच्या  पोलीस मित्रांचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
       युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या धुळे जिल्हा,शिरपूर टीमने केलेल्या गौरवास्पद कामगिरी चे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,उपाध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस,संचालक मंडळ,राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शक वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान विकास मंच,राज्य युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय संघटक डॉ,राजेश्वर हेंद्रे,युवा क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष हभप मधुकर महाराज अहिरे मनमाड,मुंबई विभाग अध्यक्ष वाघ साहेब,महिला मंच च्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds