शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : श्री संत गजानन महाराजांचा 147 प्रगट दिन सोहळा मग वैद्य सप्तमी दि. 20 गुरुवार रोजी राऊतवाडी शिक्रापूर येथे संपन्न झाला. महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यात अनेक भक्तांचा उद्धार केला व त्यांना भक्ती मार्गाला लावले त्याच अनुभूतीतून ठिकठिकाणाहून आलेल्या भक्त मंडळींनी गजानन महाराज मंदिर राऊतवाडी, शिक्रापूर येथे दर्शन,आरती, सामूहिक बावन्न पठण व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी शिक्रापूर ग्रामपंचायत चे लोकप्रिय सरपंच रमेश गडदे सहकुटुंब उपस्थित होते. त्यांनी मोठ्या आस्थेने व आपुलकीने येणाऱ्या भक्तांचे अनुभव जाणून घेतले. त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ राऊत व सेवा समितीतील सदस्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह द्विगुणित केला. सेवकांनीही सेवेतून समाधान ही महाराजांची शिकवण अंगी बाळगून धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सरपंच गडदे यांनी यथोचित शक्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. सेवा समितीतील सदस्य संदीप खर्चे यांनी भक्ती भावाने काढलेली श्रींची ची रांगोळी ही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. यावेळी शिव व्याख्याते शरद दरेकर पाटील व अन्य मान्यवर, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.