शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय ग्रामपंचायत शिक्रापूर या ग्रंथालयास छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिक्रापूर येथील युवा उद्योजक व वाचनालयाचे सभासद प्रशांत अर्जुन वाबळे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधत महाराजांचा पुतळा वाचनालयास सप्रेम भेट दिला. यावेळी आदर्श सरपंच रमेशराव गडदे ,ग्रामपंचायत अधिकारी शिवाजीराव शिंदे ,आदर्श ग्रंथपाल संतोष काळे यांच्या उपस्थितीत पुतळा स्वीकारण्यात आला. यावेळी वाचनालय सभासद अमोल मडोळे वाचनालयाचे बालवाचक, विद्यार्थी उपस्थित होते.