ग्रामस्वछता अभियान आणि मातृ-पितृ पूजनाने झाली निमगाव माळुंगे गावचे आदर्श सरपंच बापूसाहेब काळे यांच्या वाढदिवसाची सुरवात

64

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : निमगाव म्हाळुंगी गावचे विद्यमान आदर्श सरपंच बापूसाहेब काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निमगाव म्हाळुंगी मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काल सकाळी ७:३० वाजता दिलीपराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शिवराज पवार, भूषण दौंडकर, आर्यन चव्हाण, युवराज चव्हाण, शौर्य दोरगे, आदित्य धोत्रे, गणेश चव्हाण, आदित्य कुटे, प्रथमेश कुटे, कृष्णा शिंदे, हर्षल धोत्रे, राजकुमार कांबळे, प्रेम लोखंडे, कु.अपूर्वा दौंडकर या सर्व तरुणांनी गावातील मुख्य बाजार पेठ व गावातील सर्व मंदिरे झाडून आणि पाण्याने स्वच्छ धुवून काढली. तसेच सायंकाळी सात वाजता भारतीय संस्कृती रक्षक सेना आणि योग वेदांत सेवा समिती यांच्या माध्यमातून संतोष गायकवाड, राधा नागोसे, पुंडलिक नागोसे आणि उमेश खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील 51 माता पित्यांचे पूजन आपल्या मुलामुलींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आई वडिलांना आयुष्यात कधीही विसरता कामा नये, आई-वडिलांचा मान सन्मान करावा, आई-वडिलांची रोज दैनंदिन पाया पडून पूजा केली पाहिजे आणि आपल्या आई-वडिलांना आयुष्यात कधीही वृद्धाश्रमात पाठवू नये अशा स्वरूपाचे संस्कार मातृ पितृ पुजनाच्या कार्यक्रमात सरपंच बापूसाहेब काळे यांच्या वतीने देण्यात आले.
आई-वडिलांची पूजा करत असताना भगवान शंकर आणि पार्वती देवींची मुलं असणाऱ्या गणपतीला आणि कार्तिक स्वामी यांचे स्मरण करून जस देवांनी आपल्या आई- वडिलांभोवती प्रदक्षिणा घातली.  त्याचप्रमाणे पूजेला बसलेल्या मुलामुलींनी आपल्या आईवडिलांच्या भोवती सात प्रदक्षिणा घातल्या. त्यावेळी आईवडिलांसहित मुलेही मोठ्या प्रमाणात भावुक झाली. त्यावेळेस भावुक झालेल्या आई-वडिलांच्या आणि मुलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. निमगाव म्हाळुंगी मध्ये प्रथमच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे गावातील उपस्थित ग्रामस्थ सुद्धा मातृ-पितृ पूजणाच्या कार्यक्रम उत्साहाने पाहून कौतुक करत होते. मातृ – पितृ पूजन कार्यक्रम प्रसन्न वातावरणात अतिशय मोठया उत्साहामध्ये पार पडला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल करपे आणि पत्रकार निलेश जगताप आदींची या कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त झाली. यावेळी हभप ईश्वर महाराज डुबे, बाबुराव चौधरी, नामदेव काळे, बाबा नागवडे, दत्तात्रय नागवडे, मनोहर चव्हाण, कुणाल काळे यांचे सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे सायंकाळी सहा वाजता हभप ईश्वर महाराज डुबे यांचे समाजप्रबोधन पर भारूड सादर झाले तर दुसऱ्या दिवशी सकाळी निमगाव म्हाळुंगीतील महिलांसाठी मोफत माता एकविरा आई दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले.  निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे यांनी राबवलेल्या या सर्व उपक्रमांचे समाजात आदर्श घेतला जात असून सर्व उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे आणि सर्व उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या काळात ग्रामस्थांनी केलेले माझ्यावरती प्रेम हे मी कधीही विसरू शकणार नाही अशा स्वरूपाच्या भावना यावेळी सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केल्या. तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयंत पाटील साहेब, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे साहेब, यांनी वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी प्रसिद्ध निवेदक आणि सूर्यदत्ता ग्रुपचे प्रा.डॉ सुनील धनगर, हभप ईश्वर महाराज डुबे, दिलीप चव्हाण, बाबुराव चौधरी, विक्रम साकोरे आदी मंडळी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds