समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,संपादक) – एकाच सामान नावाच्या दोन व्यक्ती गावात वास्तव्यास असल्याने यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाची नोंद गावातील त्याच सारख्या नावाच्या जिवंत असणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर लावण्याचा अजब प्रकार त्या गावातील तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून झाला होता. या बाबतची माहिती पिंपरखेड ता.शिरूर येथील पिडीत शेतकरी बाळू बाबू बोंबे यांनी ४ दिवसांपूर्वीच युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांना देताच त्यांनी तात्काळ या विभागाच्या प्रांताधिकारी पूनम अहिरे यांच्याशी संपर्क साधत त्या पिडीत शेतकऱ्यास त्वरीत न्याय देण्याची मागणी केली होती. प्रांताधिकारी अहिरे यांनी प्रा.शेटे यांना ३ दिवसात ही प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कालच अहिरे यांनी याबाबत शिरूर तहसीलदारांना पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या लेखी पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याला लवकरच न्याय मिळून त्याचा जमिनीचा सातबारा पूर्ववत होणार असल्याने पत्रकार शेटे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने व कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी,पुणे, पूनम अहिरे यांनी हे प्रकरण प्राधान्याने मार्गी लावल्याने पिंपरखेड येथील संबंधित शेतकरी बोंबे यांनी समाधान व्यक्त करीत त्यांना धन्यवाद दिले आहेत.

बातमीचा परिणाम
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे एकाच सारख्या नावाचे दोन शेतकरी असून त्यातील एक शेतकरी हे मयत झालेलेआहेत.मयत शेतकऱ्याच्या कायदेशीर वारसानी वारस नोंद करण्याठी महसूल विभागाकडे अर्ज सादर केला होता. मयत शेतकरयाचा मिळकत गट नंबर २६० असून वारस नोंद करण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ त्याच गटाचा समावेश असताना देखील नावात साम्य असलेल्या नावाच्या दुसन्या शेतकर्याच्या मिळकत नंबर.२६२ गट क्रमांकाचा काहीही उल्लेख व संबंध नसताना वारसनोंद केली आहे. मात्र मयत व्यक्तीच्या वारसांनी सादर केलेल्या अर्जात केवळ मयत शेतकऱ्याच्या नावे असलेला मिळकत शेतजमीन गट नंबर समाविष्ट केला होता. मात्र तत्कालीन तलाठी तसेच मंडलाधिकारी यांनी वारस नोंद अर्जाची योग्य पाहणी व योग्य शहानिशा न करताच नावात साम्य असलेल्या जिवंत असलेल्या त्याच नावाच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या गट क्रमांकावर मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांची नोंद घातलेली आहे.
बाळासाहेब म्हस्के – तहसीलदार,शिरूर
– शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बाळू बाबू बोंबे या हयात असलेल्या शेतकऱ्याच्या सातबारावर मयत झालेल्या त्याच नावाच्या शेतकऱ्याच्या वारसांची नोंद या बाबतच्या दुरुस्ती बाबत चे प्रांताधिकारी,शिरूर,पुणे यांचे आदेश कालच प्राप्त झाले आहेत. आगामी आठ दिवसांत या प्रकरणी तात्काळ सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढण्यात येईल. त्यानंतर संबंधित अधिकारी,कर्मचारयांना सदर शेतकऱ्याचा ७/१२ उतारा दुरर्स्ती संदर्भात सूचना करण्यात येईल. आगामी ८ दिवसांत पिंपरखेड येथील हे प्रकरण निकाली काढून नक्कीच मार्गी लावले जाईल.