समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथे ट्रस्ट फाउंडेशन विश्वस्त संस्था तयार करण्यासाठी मनीषाताई गडदे( सामाजिक कार्यकर्त्या) व रमेशराव गडदे (सरपंच ग्रा.शिक्रापूर) व सहकारी मित्र परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण बैठक आयोजित केली होती. विश्वसनीय व्यक्तींची पदाधिकारी निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचा उद्देश काय असेल हे निश्चित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक आरोग्य ,खेळ,महिला, गरीब व वंचित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने काम इ.उद्दिष्टांसाठी फाउंडेशन स्थापनेच्या बाबतीत चर्चा करून “कर्तव्य फाउंडेशन” ट्रस्टचे नाव निश्चित करण्यात आले. यावेळी ट्रस्ट डीड तयार करणे म्हणजेच ट्रस्टचे नाव ,उद्दिष्ट, विश्वस्तांची नावे, आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सर्वानुमते चर्चिल्या गेल्या. ट्रस्ट डीड संबंधित नोंदणी करणे बाबत चर्चा करून विश्वस्तांची ओळखपत्रे ,आधार कार्ड ,पॅन कार्ड ,फोटो इत्यादी जमा करणे बाबत सर्वांना सूचना देण्यात आली .नोंदणीसाठी विश्वस्त सभासदांनी प्रत्यक्ष वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. नोंदणी झाल्यानंतर फाउंडेशनचे पॅन कार्ड ,80G प्रमाणपत्र ,नोंदणी झाल्यानंतर ट्रस्ट- फाउंडेशनच्या नावाने बँक खाते उघडणे इत्यादी महत्त्वाच्या विषयावर सर्वांशी चर्चा करण्यात आली. फाउंडेशन ट्रस्ट स्थापन झाल्यावर त्यांच्या उद्देशानुसार कार्य नियमितपणे चालवावे लागतात ,सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक असते या सर्व ट्रस्ट फाउंडेशन प्रक्रियेबाबत चर्चा करून फाउंडेशन कायदेशीररित्या कार्यान्वित करण्याबाबत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते एकमताने मंजुरी देण्यात आली. दरम्यान सर्व उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला व यापूर्वी केलेल्या कामांचा लेखाजोखा आढावा ढोबळमानाने मांडत चहापानानंतर कार्यक्रमाची सर्वानुमते आभार व्यक्त करत सांगता करण्यात आली. यावेळी फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन निलेश जगताप यांनी केले तर प्रस्ताविक अध्यक्षा मनिषा ताई गडदे यांनी केले.
                                                                            
                                                                                                                                            
				


