मुरबाड,ठाणे : मुरबाड च्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य, शेजारीच होते मासळी व भाजीपाल्याची विक्री, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

670
            मुरबाड,ठाणे : मुरबाड शहराच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य तयार झाले असुन या साम्राज्यात मासळी व भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 लगत असलेल्या मुरबाड शहराच्या प्रवेशद्रारावरच मासळी बाजार, भाजीपाला विक्री होत असल्याने उघड्यावर होत असलेल्या व नगरपंचायत च्या अस्वच्छ कारभाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
            मुरबाड नगरपंचायत लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च करत असताना प्रवेशद्रारावरचे घाणीचे साम्राज्य दुर करण्यात अपयशी ठरली आहे. शहरात फुटपाथ रिकामे होत नसल्याने पायी चालणाऱ्या नागरीकाना गैरसोय होत आहे.  तर राष्ट्रीय महामार्गा वरिल मासळी बाजार न हालविल्याने आपघाताची शक्यता वाढली आहे.मुरबाड बस आगाराच्या सुरक्षा भिती लगत असलेल्या उघड्या  गटारीत घाणीचे साम्राज्य असुन याच गटारी लगत हा मासळी बाजार व भाजी पाल्याचे दुकाने लागत असल्याने मुरबाड मधिल नागरिकांचे व वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार सुचना जावुनही नगरपंचायत हे घाणीचे साम्राज्य दुर,तसेच फुटपाथ मोकळे करण्यास अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकातुन येत आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *