समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मतदारसंघात एकेकाळी केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, कालांतराने पक्षाचे वर्चस्व कमी झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत सुभाष गोटीराम पवार यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुवर्ण दिवस येतील असा निर्धार सुभाष पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत विजयाचा निश्चय करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवळे येथे ही बैठक पार पडली. या वेळी माजी आमदार गोटीराम पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, चिटणीस कालिदास देशमुख, कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेहेर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. रुपाली कराळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस लियाकत शेख, वांगणी शहराध्यक्ष डॉ. भूषण देशमुख, सेवादल संघटक सुरेखा गायकवाड, मुरबाड तालुकाध्यक्ष दिपक वाघचौडे, पुष्पाताई दळवी, बदलापूर शहर प्रदेश अधिकारी हेमंत रुमणे आदी उपस्थित होते. शरद पवार यांच्या कामातील ऊर्जा पाहता आपल्याला थांबून चालायचे नाही, अशी भावना बैठकीत व्यक्त करुन विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे यांनी केले. मुरबाडचा आमदार ज्या पक्षाचा असतो, त्या पक्षाचे सरकार येते, असा योगायोग अनेक वेळा घडला आहे. त्यामुळे यंदाही सुभाष पवार यांच्या विजयाने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू या, असे आवाहन अविनाश देशमुख यांनी केले. विद्यमान आमदारांनी छापलेली विकासपर्व पुस्तिका ही भकासपर्व असे समजून वाचावी लागते, हे दुर्देवी आहे, अशी खंत कालिदास देशमुख यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांचा विश्वास आपणा सर्वांना सार्थ ठरविण्याचे आवाहन माजी आमदार गोटीराम पवार यांनी केले.
Home बातम्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
BySamajsheelOctober 24, 20240
494
Previous Postशिरूर हवेलीतून अखेर भाजपाचे संजय पाचंगे अपक्ष म्हणून मैदानात - विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
Next Postविनोद तावडे च्या उपस्थितीत किसन कथोरे यांनी भरला विधानसभेचा उमेदवारी अर्ज