समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांनी ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी आयोजित केलेल्या मीटिंगमध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केली. यावेळी पोलीस स्टेशनचे हद्दीतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पत्रकार बंधू उपस्थित होते. गावाच्या रक्षणासाठी गावातील तरुणांनी एकत्र यावे असे आवाहन ढोले यांनी केली. यावेळी पोलीस पाटील पांडुरंग नरके आणि राहुल दिघे रूपाली भुजबळ, राजेंद्र गायकवाड, प्रकाश करपे, वंदन साबळे, सतीश गावडे, किरण काळे, पूनम चौधरी, कोमल शिंदे, गोपाल भुजबळ अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संदीप कारंडे यांनी केले. गावो-गावी ग्रामसुरक्षा दल प्रभावीपणे राबवून गावची शांतता राखावी असे पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.