वळसे पाटील यांचा केंदूर, करंदी गावभेट दौरा

43

नव्याने मंजूर व नुकतेच पूर्ण झालेल्या कामांचे केले भूमिपूजन व लोकार्पण

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : दिलीप वळसे पाटील हे शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील केंदूर गावातील थिटेवाडी, वलीबाबा दर्गा, जांभळावस्ती, पाचवड व महादेववाडी या भागांना भेट त्यांनी दिली. यावेळी गावात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी बोलताना, मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे ग्रामस्थांची भेट घेणे शक्य झाले नसून, मात्र या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी आस्थेवाईकपणे माझ्या तब्येतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेलं प्रेम आणि आपुलकी पाहून खरोखरच समाधान वाटले.तर नागरिकांनी जो विश्वास मागील काळापासून ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा नेहमीच प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच यापुढील काळात देखील गावाच्या विकासाला गती देऊ, अशी ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली. याप्रसंगी मोठ्यासंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याच प्रमाणे गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील करंदी या गावाला भेट दिली असता या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. केंदूर या गावातील बहुसंख्य विकासकामे पूर्ण झाली असून, काही कामे प्रगतीपथावर असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. व कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी गावातील नव्याने मंजूर झालेल्या व नुकतेच पूर्ण झालेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. गावाच्या विकासाठी आम्ही कटिबद्ध असून, येत्या काळात गावाच्या विकासात कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, असा विश्वास यावेळी पाटील यांनी ग्रामस्थांना दिला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *