शॉर्टसर्किटने सुमारे १५ एकरातील ऊस जळाला – मलठणच्या शिंदेवाडीतील घटना 

523
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील मलठण जवळच्या शिंदेवाडी येथे आज सकाळी १० ते ११  च्या दरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटने सुमारे दहा ते पंधरा एकरातील तोडणी योग्य झालेला ऊस पिक जळून खाक झाल्याची घटना घडली. याबाबत बाधीत शेतकरी पिंटू कोळपे, सुभाष कोळपे, दत्ता शिंदे या शेतकऱ्यांनी समाजशील न्युजशी बोलताना माहिती दिली. शिंदेवाडी येथील भाऊ बाबू कोळपे व तुकाराम बाबू कोळपे व सतिश बाबू कोळपे, दत्तात्रय जिजाबा शिंदे, बाळू गंगाराम कोळपे,चांगदेव पोपट शिंदे बिरा मल्हारी कोळपे,बाबु मल्हारी कोळपे,सुभाष मल्हारी कोळपे या शेतकर्यांचा ऊस देखील आगीच्या भक्षस्थानी पडला असल्याची माहिती मलठणचे माजी सरपंच कैलास कोळपे यांनी दिली.शिंदेवाडी येथील स्मशानभूमी नाजिक व ओढ्याच्या पलीकडे असलेल्या सुमारे दहा ते पंधरा एकर ऊस जवळच असलेल्या विजेच्या ट्रांसफार्मर नजिक असलेल्या विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याची शक्यता बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असून याबाबत  मलठण मंडल अधिकारी माधुरी बागले यांना या घटनेबाबत कळविण्यात आले असता या घटनेचा पंचनामा करण्यासंदर्भात संबंधितांना तात्काळ सूचना देत असल्याचे त्यांनी सांगितले तर महावितरण चे शिरूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांना देखील या घटनेबाबत तात्काळ माहिती देण्यात आली असून घटनेची योग्य ती चौकशी करून, वस्तू स्थिती पाहून पंचनामा करण्यात येनार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पराग साखर कारखान्याचे शेती अधिकारी अंकुश आढाव यांना या घटनेबाबत कळविल्यानंतर उद्या सकाळी या जळीत झालेल्या उसाची पाहणी करून योग्य निर्णय घेण्यात येईल. तर पराग कारखान्याने आमचा जळीत झालेला ऊस कारखाना सुरू होताच तोडून न्यावा व आम्हाला दिलासा द्यावा अशी विनंती बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds