शिक्रापूर येथे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त शंकर महाराज शेवाळे यांचे किर्तन सेवा संपन्न

समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथे संत सावता महाराज मंदिरामध्ये संत शिरोमणी सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. दिनांक 16 ते 23 या दरम्यान विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये भजन कीर्तन काकडा, जागर आदी कार्यक्रम ठेवण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार  शंकर महाराज शेवाळे यांचे किर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी शेवाळे महाराजांनी सावता महाराजांचा कार्याचा आलेख उलगडून दाखवला. सावता महाराज सर्व संतांमध्ये आवडीचे होते. म्हणून पंढरीचा विठुराया त्यांना खास भेटण्यासाठी अरण येथे आले. सुमारे दोन तासाच्या कीर्तनात त्यांनी अनेक प्रकारचे दाखले देऊन सावता महाराज कसे श्रेष्ठ होते याची माहिती सांगितली. यावेळी शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेश गडदे, माजी सरपंच शिरिष जकाते, हेमंत करंजे, अनिल भुजबळ, रवींद्र भुजबळ, जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी ताई सासवडे, समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सोमनाथ भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर तसेच शिक्रापूर ग्रामपंचायत उपसरपंच वंदनाताई भुजबळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांत भव्य प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रमेश भुजबळ, सचिव पोपटराव गायकवाड ट्रस्टचे सर्व सदस्य सर्व समाज बांधवांनी केली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds