समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : विठ्ठल मंदिर या ठिकाणी 12 बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून एक दिवस काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. सकाळी सात वाजता विठ्ठल रुक्मिणीची दुसरी आरती झाल्यानंतर सर्वांना नाश्त्याची व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याप्रसंगी कल्पवृक्ष भजनी मंडळ यांच्या रूपाने काकड आरती सेवा संपन्न झाली. त्यामध्ये उपस्थितांमध्ये प्रामुख्याने मनीषाताई धुमाळ, सुरेखाताई खरपुडे, ज्योतीताई महाजन, सुरेखाताई मांढरे, विश्वस्त अनिल गायकवाड, मा. विश्वस्त विजू मांढरे, कुंडलिकराव खेडकर, वामनराव सासवडे, दीपक करंजे, अण्णा दाते, बाळासाहेब जनार्दनचव्हाण, सुरेश मांढरे , चंद्रकांत राऊत, सोपान खरपुडे, गणेश सासवडे, लाला मांढरे, सरपंच रमेश गडदे, मारुती तात्या महाजन, महेश शिर्के, स्वप्निल महाजन, शिक्रापूर परिसरातील सर्व मंदिराचे देखभाल करणारे बाळूसाहेब शेंडे, नाट्य परिषदेचे राजाराम गायकवाड, निलेश जगताप, तसेच भजनी सेवा मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.