शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे काही काळ कार्यरत असणारे परंतु आता पुण्याच्या भालचंद्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे सहाय्यक प्राध्यापक असलेले व या विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश ढोबळे पाटील यांना ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन द्वारा आयोजित भारतीय ज्ञान रत्न पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. पुणे शैक्षणिक विभाग मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार, मलखांब गुरु पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते गुणगौरव व सन्मान चिन्ह देऊन डॉ. अविनाश ढोबळे पाटील याच्या कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.ग्लोबल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुनील बेळगावे सर व इतर मान्यवर उपस्तीत राहून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. हा कार्यक्रम यशोधा साभागृह पुणे येथे संपन्न झाला.
Previous Postवळसे पाटील यांचा केंदूर, करंदी गावभेट दौरा
Next Postना. दिलीपराव वळसे पाटील यांचे शिरूर- आंबेगावच्या चौफेर विकासाकडे सदैव लक्ष - प्रवीणकुमार बाफणा