कवठे – टाकळी हाजी गटातील सुज्ञ जनता ना.वळसे पाटील यांच्या पाठीशीच – राजेंद्र सांडभोर 

215
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  शिरूर तालुक्यातील कवठे – टाकळी हाजी गटात शिरूर आंबेगाव चे विकास पुरुष समजले जाणारे राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षात झालेली कोट्यवधी रुपयांची विकास कामे यांची आठवण ठेवत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत कवठे – टाकळी हाजी,बेट भागासह या गटातील सुज्ञ जनता,मतदार ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीशीच ठाम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे या गटाचे अध्यक्ष राजेंद्र सांडभोर यांनी केले. ते शिरूर तालुक्यातील त्यांच्या कवठे येमाई गावातील गोसावी,सांडभोर या वस्तीवर पक्षाच्या युवा नेत्या पूर्वाताई वळसे पाटील यांच्या गावभेट दरम्यान बोलत होते.
        राजकारणातील प्रदीर्घ अनुभव व राज्याच्या राजकारणातील पहिल्या फळीत भक्कम व अग्रणी स्थान असलेले सहाकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील एक अभ्यासू, कुशल व संयमी नेतृत्व आम्हाला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान असून त्यांच्या माध्यमातून या भागात रस्ते,पाणी,वीज,विविध विकासात्मक योजना,आधुनिक क्षैक्षणिक वास्तू,सभागृहे,तरुणांसाठी व्यायाम शाळा उभ्या राहिल्या आहेत. ना.वळसे पाटील हे दूरदृष्टी असणारे नेतृत्व असून एकेकाळी सतत दुष्काळी समजला जाणारा आपला भाग केवळ आणि केवळ ना.वळसे पाटील साहेबांच्या अथक प्रयत्नातून सुजलाम सुफलाम झाला असून त्यांच्या माध्यमातून घोडनदीवर बांधण्यात आलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे,दळणवळण अधिक सुखकर व्हावे म्हणून घोडनदीवर बांधण्यात आलेले भक्कम पूल,कवठे गावचे ग्रामदैवत,तथा राज्यातील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री येमाई मंदिरास मिळालेला तीर्थ क्षेत्राचा दर्जा,भाविकांची देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेत ना. वळसे साहेबांच्या माध्यमातून दुपदरी रस्त्यास मिळालेली मान्यता या व अशा अनेक समाज हिताच्या योजना ना.वळसे पाटील यांनी गटात राबविल्या आहेत. घोडनदीत सातत्याने पाणी उपलब्ध होत असल्याने या भागातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळाला. घोडनदी व उजव्या कॅनाल द्वारे मिळणारे पाणी यामुळे या भागातील शेतकरी उसाचे मुख्य पीक घेऊ लागला. जवळच भीमाशंकर सहकारी व पराग साखर कारखाना झाल्याने उत्पादित केलेला ऊस त्या कारखान्यांना देत मुबलक उत्पन्न मिळु लागले.आर्थिक श्रोत त्यामुळे चांगला झाला.जीवनक्रम ही बदलला. केवळ पावसावर अवलंबून असणारी जिरायत शेती नदी,कॅनॉल द्वारे उपलब्ध पाण्यामुळे सधन झाली. जीवनमान उंचावले. जुनी घरे जाऊन बहुतेकांनी नवीन आकर्षक इमारती बांधल्या.त्या काळात तुरळक दिसणाऱ्या सायकली जवाळपास अडगळीत गेल्या. अनेकांकडे दुचाकी,चारचाकी,ट्रॅक्टर,मालवाहतूक वाहने घेण्याची क्षमता निर्माण झाली. बेट भागातील पिंपरखेड,जांबुत,वडनेर,फाकटे,चांडोह,टाकळी हाजी,डोंगरगण,म्हसे,आमदाबाद,सविंदणे,मलठण,कवठे येमाई ह्या संपूर्ण परिसराचा मागील पंधरा वर्षात कायापालट झाला आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांची भक्कम साथ आजही वळसे पाटील यांना आहे.मग एवढी सगळी कोट्यावधी रुपयांची विकासकामे करणारे या भागाचे लोकप्रियआमदार ना.दिलीपराव वळसे पाटील यांनाच कवठे – टाकळी हाजी गटातील सुज्ञ जनता,तरुण भरगोस पाठिंबा देतील असा विश्वास राजेंद्र सांडभोर यांनी व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds