शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – जिद्द,चिकाटी व मेहनत घ्यायची तयारी असली की,अशक्य ही शक्य होते.असाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजुरी येथील शेतकरी औदुंबर शिंदे,महेश शिंदे या बंधूंनी सिद्ध करून दाखवलाय.
पेशाने शिक्षक असलेले पण शेतीवर नितांत निष्ठा व प्रेम ठेवत शेतीत शेतीत स्वतः राबतानाच मजुरांच्या सहाय्याने विविध पिके यशस्वीपणे घेत कुटुंबाला शाश्वत आर्थिक श्रोत निर्माण करणारे करमाळा तालुक्यातील राजुरी येथील शेतकरी औदुंबर शिंदे यांनी आपल्या एकूण शेतीपैकी २ एकर क्षेत्रात उपलब्ध पाण्यावर जैन जातीची केली रोपे लावत एक अभिनव उपक्रम राबवलाय.केळी रोपांची योग्य ती निगा राखल्याने ११ महिन्यातच उत्पन्न सुरु झाल्याचे शिंदे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.त्यांचे दुसरे बंधू महेश शिंदे हे अभियंता असून ते सध्या सिंगापूर येथे कार्यरत आहेत.
शिंदे यांनी २ एकरात जैन जातीच्या केळी रोपांची ११ महिन्यांपूर्वी लागावा करताना लागवड,मशागत,खते,औषधे असा सुमारे अडीच लाख रुपये खर्च त्यांना आला असून जैन जातीची केळीची २४00 रोपे ११ महिन्यापूर्वी लावली. तोडणी योग्य झालेल्या कच्च्या केळी घडांची उत्तम गुणवत्ता पाहून व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी होऊ लागली. नुकतीच केली घडांची पहीलीच तोड झाली असून ९००० किलो कच्ची केळी २९ रुपये प्रती किलो दर जागेवर व रोख स्वरूपात मिळाल्याने शिंदे यांना पहिल्याच तोडीत सुमारे ३ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे औदूंबर यांनी सांगितले.अजून किमान ५ तोडे होण्याची खात्री शिंदे सरांना असून यातून किमान १५ लाख रुपयांच्या पुढे हमाखास उत्पन्न मिळेल असा विश्वास औदूंबर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.राजुरी सारख्या छोट्या गावातील शिंदे बंधूनी दोन एकर क्षेत्रात नियोजन बद्ध केळीचे अभिनव पीक घेत मिळवलेले यश इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच आदर्शवत,प्रेरणादायी ठरेल.