महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने नवीन पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न 

पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने नवीन पदाधिकारी नियुक्ती सोहळ्याचे आयोजन रांजणगाव गणपती येथील सभागृहात करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून   महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मयुरेश अरगड, प्रदेश सरचिटणीस राहुल आवटी,जिल्हाध्यक्ष तुषार निंबरगी, युवा जिल्हाध्यक्ष ओमकार देव, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अनघा पाठकजी, जिल्हा सरचिटणीस गणेश कुलकर्णी व इतर मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची जबाबदारी सुपूर्त करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या एकूण कार्यपद्धती, आगामी योजना आणि समाजहिताचे उपक्रम यावर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मयूरेश अरगड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत समाजसेवेची नवी दिशा दाखवण्याचे आवाहन केले. तसेच, सामाजिक ऐक्य, शिक्षण, सांस्कृतिक जतन व युवकांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा पाठकजी यांनी केले तर आभारप्रदर्शन अतुल पाठकजी यांनी व्यक्त केले. उपस्थित नागरिकांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे –  

महाराष्ट्र ब्राम्हण सभा
१) युवा जिल्हाध्यक्ष – श्री. ओमकार देव

२) शिरुर शहर कार्यकारीणी 
अध्यक्ष – चैतन्य वाघ
उपाध्यक्ष –  निरंजन कुलकर्णी
उपाध्यक्ष – धनश्री जोशी
सरचिटणीस – प्रशांत जोशी
सरचिटणीस – केतन साळकर
सचिव – भावार्थ कुलकर्णी
कार्याध्यक्ष – डॉ. ज्योती मुळे

३) शिरुर तालुका कार्यकारिणी

अध्यक्ष – अरुण कुलकर्णी
अध्यक्ष – सीमा काशीकर (महिला आघाडी)
उपाध्यक्ष – श्रीहरी काळे

उपाध्यक्ष – महेश कुलकर्णी
उपाध्यक्ष – गायत्री भवाळकर (महिला आघाडी)
सरचिटणीस – सतिश काजळकर
सरचिटणीस – मिनावी कुलकर्णी (महिला आघाडी )
४) शिरुर तालुका युवा कार्यकारिणी –
अध्यक्ष – वरद कुलकर्णी
उपाध्यक्ष – देवकीनंदन शेटे
उपाध्यक्ष – श्रीकांत कुलकर्णी
उपाध्यक्ष – पराग साखरे
सरचिटणीस – गणेश सातभाई
सरचिटणीस – आदित्य काजळकर
सचिव – विश्वंभर भंडारी

(५) शिरुर तालुका सल्लागार समिती
गोरे विजयकुमार
कुलकर्णी विजयकुमार
गोसावी विलास
काळे अशोक
चौधरी सुनीता




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds