समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आषाढ महिना संपला व श्रावण सुरु झाला.हिंदू धर्मात १२ महिन्यात श्रावण महिना अत्यंत पवित्र व अध्यात्म,धार्मिक व्रत,संकल्पासाठी खूपच पवित्र मानला जातो. गावोगावच्या देवदेवतांच्या मंदिरात या महिन्यात भाविकांची श्रद्धेने दर्शनासाठी गर्दी झालेली दिसून येते. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई हे एक ऐतिहासिक महत्व असलेले गाव. गावात अनेक ऐतिहासिक,पौराणिक,पांडवकालीन व अत्यंत सुस्थितीत असलेली भव्य मंदिरे पाहावयास मिळतात. त्यापैकीच एक कवठे गावठाणात असलेले सुमारे ७०० वर्षांपूर्वी संपूर्ण भव्य दगडी बांधकामात बांधलेले गावाच्या मध्यभागी असलेले श्री हनुमंताचे एक जागृत देवस्थान आहे. आणि श्रावण मासातील पहिल्या शनिवारचे औचित्य साधत भाविकांनी आज सकाळपासूनच मंदिरात हनुमंताच्या दर्शनासाठी,पूजेसाठी गर्दी केली होती.
देवाच्या दिव्यात तेल,श्रीफळ अर्पण व रुईच्या पानाच्या माळा भाविक भक्तीभावाने अर्पण करीत होते. गावातील तरुणांनी या पुरातन हनुमान मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार केला असून देवालयात आता खूप च प्रसन्नता वाटत आहे. अनेक भाविकांनी आज देवालयात येत हनुमान चालीसा,मारुती स्तोत्राचे पठाण ही केले. दरम्यान आज सायंकाळ नंतर मंदिरात कणकेचे दिवे,नैवैद्य ठेवण्यासाठी महिलांची मोठी व दर्शनासाठी पुरुषांची गर्दी होण्याची शक्यता मंदिराचे पुजारी शिंदे गुरव व सामाजिक कार्यकर्ते संदीप (पिंट्या) गायकवाड यांनी सा. समाजशील शी बोलताना व्यक्त केली.