समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची शासनाने ३१ जुलै पर्यंत अंतिम मुदत दिली असून वंचित शेतकऱ्यांनी तात्काळ विमा अर्ज भरून या योजनेत सहभागी होण्यास आवाहन शिरूर तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक व या भागाचे सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी सा. समाजशील शी बोलताना दिली.अद्याप अनेक शेतकरी या विमा योजनेत सहभागी होण्यापासून वंचित राहिले आहेत. शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कवठे येमाई ता. शिरूर येथे शेतकरांना या योजने संदर्भात समाज माध्यमाद्वारे तसेच भित्तीपत्रकाद्वारे या विभागाचे सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी या अध्यादेशाची प्रत व शेतकर्यांनी सादर करावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सातत्याने केले आहे. अद्याप बऱ्याच शेतकरयांनी पीक विमा उतरवलेला नाही,पेरणी केलेले पीक वाया गेले तर शासनाने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेतून सदर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळू शकेल या करीता या योजनेत सहभागासाठी सरकारने दिलेल्या ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या तारखेपर्यंत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहाभाग नोंदविण्याचे आवाहन सुवर्णा आदक व नंदू जाधव यांनी केले आहे.
Home पुणे प्रधानमंत्री पीक विम्याची मुदत जुलै अखेर – वंचित शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विम्याची मुदत जुलै अखेर – वंचित शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
BySamajsheelJuly 25, 20250
Previous Postश्रावणातील पहिल्या शनिवारी बजरंगाच्या दर्शनासाठी गर्दी - कवठे येमाई गावातील ऐतिहासिक श्री हनुमान मंदिर
Next Postकवठे येमाईच्या इचके वाडीतील स्मशानभूमीतील विद्युत पंपावर चोरट्यांचा डल्ला - अनेक झाडांची केली नासधूस


