समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ईचके वाडी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करुन मोठ्या कष्टाने जगविलेल्या झाडांचे अज्ञात चोरट्याने मोठे नुकसान केलेच पण या जीवापाड जपलेल्या झाडांना पाणी देण्यासाठीचा असलेल्या विद्युतपंपवार देखील चोरट्यांनी डल्ला मारला आहे. घटनेमुळे परिसरातुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास इचकेवाडीत स्मशानभूमीत घुसून मोठ्या वाढीस लागलेल्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्याच बरोबर विद्युत पंप चोरून नेला. स्थानिक नागरिक या घटनेने प्रचंड संतप्त झाले असून या अज्ञात चोर व्यक्तीला कठोर शासन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाला केले आहे.अशा समाजविघातक प्रवृत्ती ला पोलीस प्रशासनाने वेळीच ठेचून त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच मनिषा पांडुरंग भोर यांनी सा.समाजशील शी बोलताना केली आहे.
या घटनेचा माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, सूदामभाऊ ईचके, उपसरपंच राजेंद्र ईचके, ग्रामपंचायत सदस्य रामदास इचके, निखिल ईचके, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर,संदिप ईचके, कवठे वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम इचके यांनी तीव्र निषेध करुन या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.