समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी उद्यानात १५ जुलै २०२५ रोजी एकाचवेळी तब्बल १६ चितळ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेचा युवा क्रांती संघटनेने काल गुरुवारी सकाळी १० वाजता उद्यानासमोर निषेध करून संबंधित अधिकाऱ्यांना हरणांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारे निवेदन दिले. युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील संघटनेचे २४ पदाधिकारी व सदस्य उद्यानात एकत्र जमले होते. सर्वांनी एकत्रितपणे उद्यान संचालक डॉ. राजकुमार जाधव यांची भेट घेऊन मृत्यू प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी करत निवेदन दिले.

या वेळी डॉ. जाधव यांनी ही घटना प्राणी संग्रहालयाच्या इतिहासातील पहिलीच अशी गंभीर घटना आहे. हरणांच्या मृत्यूमागे संभाव्य कारण साथीचा आजार असू शकतो.मृत प्राण्यांचे व्हिसेरा विविध प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. येथील प्राण्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियमित केली जाते असे ही जाधव यांनी स्पष्ट केले.यावेळी युवा क्रांतीच्या सदस्यांनी अन्नपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील त्रुटी, देखभाल यंत्रणेतील हलगर्जीपणा यावर प्रश्न उपस्थित केले. सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली गेल्यानंतर टीमने त्यांची पाहणी करून मृत्यू पावलेल्या प्राण्यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमानंतर संघटनेत नव्याने निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार ही करण्यात आला. या वेळी राजेश्वर हेंद्रे, शिवाजी शेलार, अमृताताई पठारे, वैशाली बांगर, वसुधा नाईक,अनिल रेळेकर यांनी नवपदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राजू चौधरी, शोभाताई हरगुडे, प्रतिभाताई महालकर,राजेंद्र पन्हाळे, शहाजहान शेख यांचीही उपस्थिती होती. संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी व्हिडीओ कॉलद्वारे मार्गदर्शन करत संघटनेच्या एकतेवर भर दिला.कार्यक्रमाची सांगता सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे व डॉ. स्वाती बडीये यांच्या भेटीनंतर करण्यात आली व पुढील सामाजिक उपक्रमासाठी एकजूट राहण्याचा निर्धार करत सदस्यांनी परिसरातून प्रस्थान केले.