समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील रावडेवाडी येथे शेतकऱ्यांना संघटीत करून कृषि विभागातील कर्तव्य दक्ष सहायक कृषी अधिकारी नंदू शिवाजी जाधव यांनी एक शेती विषयक नावीन्यपूर्ण प्रयोगाची माहिती देत ड्रोन द्वारे पिकांवर कीडनाशक औषध फवारणी कशी करावी व किती फायद्याची ठरते याबाबत प्रात्यक्षिक द्वारे माहिती दिली.परीसरातील शेतकऱ्यांच्या कायम संपर्कात असलेले व शेतकयांच्या हिताचे काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यासाठी प्रयत्नशिल असणारे या भागाचे सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दि. १५ ला नवनाथ विष्णू रावडे यांनी खरेदी केलेले ड्रोन आज त्यांना सुपूर्द करण्यात आले. ड्रोनची पूजा विधी करून शेतकऱ्यांना ड्रोन बाबत कंपनीच्याअधिका-यांनी सविस्तर माहिती दिली व प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवले, याप्रसंगी मंडळ कृषि अधिकारी अशोक दत्तात्रय गायकवाड व नंदू जाधव यांनी उपस्थितीतांना ड्रोनबाबत माहिती दिली व कृषि विभागामार्फत ड्रोन साठी असणारे अनुदान बाबत सविस्तर माहिती दिली.सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी परिसरातील विविध गावातून,परिसरातून शेतकरी उपस्थित होते,यामध्ये रावडेवाडी गावचे निवृत्त माजी सैनिक बाबाजी पराड, वसंत रावडे, बाळू घुले, मारुती शेटफळे,निमगाव दुडे येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी वाळुंज, विजय नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Home पुणे शिरूरच्या रावडेवाडी येथे ड्रोन द्वारे पिकांवर कीडनाशकऔषध फवारणी – सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांचे मार्गदर्शन

शिरूरच्या रावडेवाडी येथे ड्रोन द्वारे पिकांवर कीडनाशकऔषध फवारणी – सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांचे मार्गदर्शन
BySamajsheelJuly 15, 20250