कात्रज उद्यानातील १५ हरणांच्या मृत्यूचा प्रयोगशाळेचा चौकशी अहवाल जाहिर करण्याची हाय लाईट फोरमची मागणी

समाजशील न्यूज नेरावर्क,धनकवडी,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – दिनांक १४ जुलै २०१५ रोजी कात्रज प्राणी संग्रहालयातील गुढरित्या मरण पावलेल्या १५ हरणांच्या मृत्यूचा प्रयोगशाळेचा चौकशी अहवाल जाहीर करण्याची व सदर हरणांच्या  मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कर्मचा-यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्याची मागणी हाय लाईट फोरम,पुणे चे अध्यक्ष उमेश नाईक, उपाध्यक्ष राम तोरकडी, महिला सदस्य, संगीता गोसके,युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षा नाईक, भारती बोराडे, साहिल नाईक यांनी एका पत्रकाव्दारे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केली आहे . तर महापालिका आयुक्तांनी संबंधित जबाबदार कर्मचारी व तत्सम यांच्यावर पोलीसात तक्रार दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.यासंदर्भात महापालिकेने तात्काळ कारवाई करण्याची मागणी हाय लाईट फोरमचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी केली केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *