समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक सभेमध्ये शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेश रावजी गडदे यांच्या पेरणेतुन ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 आधार काठीचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जितेंद्र पानसरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे दिनकरराव कळमकर, शिवाजीराव मचे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकरमी, कर्तव्य फाउंडेशनचे सदस्य पत्रकार राजाराम गायकवाड, बाळासाहेब शेंडे, पोपटलाल भंडारी, निवृत्ती जकाते, ज्येष्ठ गुरुवर्य बाबुराव साकोरे अन्य उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, विद्यमान सरपंच रमेश गडदे, त्रिनयन कळमकर ग्रामपंचायत सदस्य बाबुराव साकोरे आदींनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सांगता माऊलींच्या पसायदान यांनी झाली.