शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर (भुजबळमळा) येथील जुन्या पिढीतील इंदुबाई काशिनाथ भुजबळ (वय ८५) यांचे वृध्दपकाळाने राहात्या घरी सोमवर दि. १० रोजी निधन झाले. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सोमनाथ भुजबळ यांच्या त्या आई तसेच शिक्रापूर नगरीचे उपसरपंच पुजाताई भुजबळ यांच्या त्याआज्जी सासु होत.