
आरोग्य दिनाच्या निमित्ताने सर्व गरोदर मातांची तपासणी करून त्यांना लोहयुक्त व कॅल्शियम औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी करडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध बोराडे, ग्रा.पं. सदस्य, संदीप नवले, जयश्री कोहकडे, उद्योजक संदीप गवारी, डॉ सुनिता पोटे, आरोग्य सेविका शरदबाली राऊत/वायसे, डॉ पल्लवी मोहतुरे, व सर्व आशाताई सेविका उपस्थित होत्या.
आरोग्य सेविका शरदबाली राऊत यांनी गरोदरपणामध्ये घ्यावयाची काळजी, आहार, वेळोवेळी महत्त्वाच्या तपासण्या, आणि मोबाईलचा कमी वापर अशा विविध गोष्टींवरती सुयोग्य मार्गदर्शन केले, डॉ. सुनीता पोटे यांनी सर्व गरोदर मातांची तपासणी केली, संदीप नवले व जयश्री कोकडे यांनी आरोग्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रकाश वायसे सदस्य घोड/कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती तथा अध्यक्ष.मीना शाखा कालवा यांच्या वतीने शिबिरास उपस्थित सर्व गरोदर मातांना फळांचे वाटप करण्यात आले.
उन्हाळ्यात गरोदर मातांनी व इतर नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध बोऱ्हाडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राऊत यांनी केले व डॉ. पल्लवी मोहतुरे यांनी सर्वांचे आभार मानले.