NEWS
Search

रात्री भर पावसात संकटात सापडलेल्या जोडप्याला मदतीचा हात : युवा क्रांतीच्या चाकण येथील आगरकर दांपत्याची योग्यवेळी मदत 

648
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,तोचि साधूसंत ओळखावा,देव तेथेची जाणावा.या उक्तीप्रमाणे व युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सामाजिक मदत कशी करावी याचे उत्कृष्ट उदाहरण युवाक्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचे खेड (राजगुरूनगर) तालुका अध्यक्ष अंकुशराव आगरकर व त्यांच्या पत्नी संघटनेच्या चाकण शहर महिला सदस्या कल्पनाताई आगरकर यांच्या माध्यमातून त्यांनी रात्री प्रवासा दरम्यान भर तुफानी पावसात दिव्यांग मुलासह संकाटात सापडलेल्या एका अनोळखी चारचाकी चालकास योग्य वेळी केलेल्या धाडसी मदतीतून नुकतेच चाकण परिसरात पाहावयास मिळाले.
    ही घटना आहे गुरुवार दि. ४ एप्रिल ची युवा क्रांती संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष अंकुशराव आगरकर व त्यांची पत्नी कल्पनाताई हे नेहमी प्रमाणेच आपल्या लाडक्या पण दिव्यांग असलेल्या दुर्वाला तिला शाळेत सोडून पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.दिवसभरातील सर्व कार्यक्रम आणि कामे ऊरकुन शेवटी त्यांच्या एका पाहुण्यांच्या गावी यात्रेनिमित्त गेल्यावर थोडा वेळच झाला एव्हाना अंधार पडू लागला व अचानक काळेकुट्ट नभ भरून आले व लगेचच पावसाचे वातावरण झाले. दरम्यान रात्रीचे साधारण साडेआठ, नऊ वाजलेले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. समोर फक्त अंधार आणि पाऊस भयानक पडत होता. पाऊस एवढा होता की गाडीच्या पुढचे पाच फुटअंतरावरील सुद्धा काहीच दिसत नव्हते.त्याही परिस्थितीत आगरकर दांपत्य आपल्या चारचाकी गाडीचे चारही इंडीकेटर लाऊन रस्ता हळू हळू मार्गक्रमण करीत होते.
दरम्यान याच रस्त्यावर  साधारण ५५/६० वयाचे जोडपे आणि त्यांचा एक दिव्यांग मुलगा साधारण त्याचे वय पंचवीस च्या आसपास असावे जोरदार पावसात त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या गाडीची दोन चाके रस्त्यावर आणि दोन चाके रस्त्याच्या खाली दोन फुटावर खोल उतरलेली दिसत होती. त्यांची गाडी अक्षरशः त्या ठिकाणावरून वाहणाऱ्या पावसाच्या भरपूर पाण्यात चक्क तंरगलेली दिसत होती.त्याही अवस्थेत त्या दिव्यांग मुलाला घेऊन त्याचे आई वडील अक्षरश पावसात भिजत गाडीच्या बाहेर ऊभे असल्याचे आगरकर दांपत्यास पाहावयास मिळाले. खानाचा ही विचार न करता दिव्यांग दुर्वांच्या काकी कल्पनाताई यांनी पती अंकुशराव आगरकर यांना आपली गाडी थांबवा.या जोडप्याला या भर पावसात आपल्या मदतीची नाक्कीच गरज असल्याचे सांगताच त्यांनी गाडी थांबवली व प्रथम त्या जोडप्याच्या दिव्यांग मुलाला आपल्या चारचाकी गाडीत आणून बसवले. त्या दिव्यांग मुलाच्या आईने त्याला सांगितले की या गाडीतून ऊतरू नको आम्ही आपली गाडी काढतो.
पाऊस जोरदार सुरूच होता.बाहेर सगळीकडे अंधारच अंधार त्याही परिस्थितीत वेळेचे गांभीर्य लक्षात घेत दुर्वाच्या काकी कल्पनाताई ने सांगितले की,आपण भिजले तरी चालेल पण त्यांची गाडी काढण्यास मदत करणे आपले कर्तव्य आहे असे सांगितले. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीस अनुसरून त्या दिव्यांग मुलाचे आई वडील,अंकुशराव,कल्पनाताई आगरकर आणि रस्त्याने चाललेला एक अनोळखी इसम या सर्वांनी जोरदार पावसाचा तडाखा सहन करीत पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत ती अडकलेली गाडी रस्त्यावर आणली. त्या २५ वर्षीय दिव्यांग मुलाला त्याचे आई वडील त्यांच्या गाडीत घेऊन गेले. संकटात सापडलेल्या माणसांना योग्य वेळी योग्य ती मदत देऊ शकल्याने युवा क्रांती संघटनेत सहभागी होत सामाजिक कार्य करण्याचे भाग्य मिळाल्याचे आगरकर दांपत्याने सा.सांजशील शी बोलताना सांगितले. जोरदार पाऊस सुरु असूनही त्या दोन्ही गाड्या आपापल्या भागाकडे हळुवारपणे मार्गस्थ झाल्या.
आगरकर दांपत्याने केलेल्या या कौतुकास्पद कार्याबद्दल संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना साहेब महाराज कापडणीस,राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शक,राष्ट्रीय किसान विकास मंच चे वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे प्राचार्य किसनराव रत्नपारखी,राष्ट्रीय सरचिटणीस अमृत ताई पठारे, महाराष्ट्र महिला अध्यक्षा वसुधाताई नाईक, महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक वर्षाताई नाईक,महिला जिल्हा प्रमुख मीनाताई गवारे,रणदिवे मॅडम,राष्ट्रीय संपर्क प्रमुख डॉ.राजेंद्र हेंद्रे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय सल्लागार भाऊसाहेब शेळके,राष्ट्रीय सल्लागार नानासाहेब बढे पाटील, राष्ट्रीय मार्गदर्शक,आनंदराव पगार,राष्ट्रीय मार्गदर्शक,ह. भ. प.अवचितानंद महाराज,पुणे जिल्हा अध्यक्ष सुदाम भाऊ रणदिवे,शिरूर तालुका सह कार्याध्यक्ष पंकज सावंत यांनी खेडचे अध्यक्ष अंकुशराव आगरकर दांपत्याचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds