NEWS
Search

सविंदणे जि. प. शाळेचे मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

117
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटच्या टोकास असलेल्या सविंदणे येथील जिल्हा परिषद प्रेमिक शाळेतील विद्यार्थ्यानी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश  संपादीत केले आहे. इयत्ता दुसरीचा कृष्णा रामचंद्र देशमुख १४४ गुण मिळवीत त्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तर शिवण्या अजित पडवळ १३८ गुण मिळवून राज्यात ७ वा क्रमांक मिळवून पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला आहे. अनुष्का मंगेश पोखरकर (१२८ गुण ),आरोही योगेश पडवळ (१२६ गुण),दुर्वा प्रदीप पडवळ (११८गुण), राजवीर अविनाश पडवळ १०८ गुण मिळवत यश संपादित केले आहे, शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्ध्याना वर्गशिक्षक लहू मनाजी शितोळे यांनी मार्गदर्शन केले आहे.
       इयत्ता तिसरीचा साईराज सुभाष पडवळ (२४२ गुण), कृष्णा राहुल मिंडे (२२६ गुण) मिळाले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटे यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता चौथीतील आर्यन रमेश पडवळ याने देखील (२१४ गुण ) मिळवले आहेत. यशस्वी विदयार्थ्यांना वर्गशिक्षक रमेश भाऊ बोखारे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गणेश बाळू पवार  यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे केंद्रप्रमुख सखाराम फंड सर, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी मा. बाळकृष्ण कळमकर यांनी अभिनंदन केले आहे. सविंदणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यानी या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल बाळासाहेब भोर अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, ग्रामस्थ सविंदणे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds